SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जरांगे पाटील बेईमान आणि ह**** माणूस; शिंदेंवरील 500 कोटी आरोपांमुळे रामदास कदमांचा संताप, 'तुझी औकात काय, याद राख आमचं दैवत...'

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर 500 कोटींसंदर्भात केलेल्या आरोपांनंतर रामदास कदम संतापले आहेत. त्यांनी दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंवर बोचरी टीका केली.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 09:21 PM IST | Updated: Oct 20, 2026, 09:31 PM IST
Image Credit: शिंदेंवरील 500 कोटी आरोपांमुळे रामदास कदमांचा संताप
Join

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर 500 कोटींसंदर्भात केलेल्या आरोपांनंतर रामदास कदम संतापले आहेत. दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी मनोज जरांगेंवर बोचरी टीका केली. जरांगे पाटील बेईमान माणूस, हरामखोर आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केला. तसंच एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे दैवत आहेत, त्यांच्याबाबत जर बोलशील तर मराठा समाज खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे तू कोण आहेस, तुझी औकाद काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. दरम्यान भाषणाच्या सुरुवातीला रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.

...तर मराठा समाज तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही

जरांगे पाटलांवर टीका करताना ते म्हणाले की, "मी आज सांगतोय की, आम्ही कधी तुमच्या विरोधात बोललो नाही. समाजाला न्याय देत आहात वैगेरे ठीक आहे. पण काल तुम्ही एकनाथ शिंदे, 500 कोटींबाबत बोललात. जर तुम्ही एकनाथ शिंदेंना उद्ध्वस्त करायला निघालात, तर महाराष्ट्रातील मराठा समाज तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही".

उपोषणाला बसतोस आणि बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस

तू आहेस कोण? असा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, "उपोषणाला बसतोस आणि बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खातोस, सगळ्यांना फसवतो". यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंकडे जरांगे पाटलांची चौकशी लावण्याची विनंती केली. ते म्हणाले, "हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठे आहे? कोणाच्या नावावर आहे? कोणत्या नातेवाईकांच्या नावावर आहे? याची चौकशी लावा. कोणत्या गाडीतून फिरतोस? या गाड्या कुठून आल्या?".

हे ही वाचा - शिंदेंनी भाजपाकडून 500 कोटी घेतले अन् मला...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले 'श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे...', कोण कोणाचा गेम करतंय?

"एक मराठा समाजाचा माणूस संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढतोय, मराठा समाजाल न्याय देतोय याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. 10 टक्के आरक्षण एकनाथ शिंदेंनी दिलं. तू बेईमान, हरामखोर माणूस आहेस. याद राख! बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. 500 कोटी कोणी दिले? कुठे दिले? कोणी मोजले दाखव. तू कोणाची सुपारी घेऊन बदनाम करत आहेस. एकनाथ शिंदेंच आमचं दैवत आहे, त्यांच्याबद्दल बोललास तर महाराष्ट्र, मराठा समाज खपवून घेणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

 

 

तुझी औकात काय? आमच्या नादाला लागू नको

पुढे ते म्हणाले, "हा स्वत:ला जगाचा मालक समजतो. पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदेंना एकेरी नावाने बोलतो. ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? तुझी औकात काय? समाजाने न्याय मिळावा यासाठी पाठिंबा दिला त्याचा गैरफायदा घेतो का? जिथे उपोषण करत होता तिथून गाववाल्यांना हाकलून दिलं. आमच्या नादाला लागू नको. याद राख एकनाथ शिंदे दोन दोन हातानं देणारे आहेत, घेणारे नाहीत. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघालास का? यापुढे गाठ शिवसैनिकांशी, मराठा समाजाशी आहे. मराठा समाजाच्या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला, तर मराठा समाज तुला संपवेल".

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ शिंदेच होते

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या नेतृत्वात झाल्या. उभ्या महाराष्ट्राने एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आहे, म्हणून युतीचे 232 आमदार निवडून दिले. मग आमचे आमदार कमी कसे? खरंतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ शिंदेच होते पण पुढे काय झालं मला माहित नाही, ते त्यांनाच माहिती असेल असं ते म्हणाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES