SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'गणेशोत्सवही महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक हल्ला आहे का?...', छठपूजेवरुन संजय निरुपमांचा थेट राज ठाकरेंना सवाल!

छठपुजा साजरी करण्यावरुन मुंबईतील राजकारण चांगलंच तापलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता संजय निरुपमांनी त्यांना उत्तर दिलंय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 13, 2026, 15:43 IST | Updated: Nov 13, 2026, 16:01 IST
Image Credit: ठाकरे विरुद्ध निरुपम
Join

छटपूजेवरून महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. छटपूजेवरून संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. भाजपचा फोडा आणि राज्य करा फॉर्म्युला चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.भाजपच्या सापळ्यात मराठी माणसानं अडकू नये असा सल्ला देखील राज ठाकरेंनी दिला आहे. यावर संजय निरुपम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय घडलंय नेमकं?

छठ पुजेवरुन राजकीय वातावरण चांगलच तापलंय. राज ठाकरेंच्या खरमरीत टीकेला संजय निरुपमांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांची ती लांबलचक एक्स-पोस्ट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला. ती पूर्ण वाचल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न आला की, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला. या संपूर्ण घटनेचा उत्तर प्रदेश निवडणुकीशी काहीही संबंध नाही. निवडणुका येतील आणि जातील, पण छठ पूजा हजारो वर्षांपासून साजरी केली जात असल्याचेही निरुपम यावेळी म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

छठ पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , तर शांत आहोत म्हणजे गां* नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत. आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते. येथे मरहट्टे राहातात ते, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा. मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

संजय निरुपमांचे प्रत्युत्तर 

छठ पूजेच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका पूर्णपणे आक्षेपार्ह आहे. भारतात, आपण सर्व वेगवेगळ्या भाषा बोलतो, आपल्या वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या ओळख, वेगवेगळ्या जीवनशैली आणि वेगवेगळ्या खाण्याच्या सवयी आहेत. प्रत्येकाच्या स्वतःच्या पूजा-अर्चा आणि सण असू शकतात. पण आपण सर्व एकमेकांवर प्रेम करतो आणि सलोख्याने एकत्र राहतो, असे निरुपम म्हणाले. जर कोणाला वाटत असेल की मुंबईतील छठ पूजेचा उत्सव हा महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक हल्ला आहे, तर मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की गणेशोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. तो दिल्ली, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, पाटणा, लखनौ आणि जौनपूर येथे होतो. तर हा महाराष्ट्रावरचा सांस्कृतिक हल्ला आहे का? नाही. गणपती आपल्या सर्वांचा आहे. गणेशोत्सव आपल्या सर्वांचा आहे. संपूर्ण देशाचा, आपल्या सर्वांचा, अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी दिली.


हायकोर्टचा नकार

गिरगाव चौपाटीवर छटपूजेला हायकोर्टाने नकार दिलाय. 1998च्या आदेशानुसार ही परवानगी नाकारण्यात आलीय. धार्मिक स्वातंत्र्य मर्यादांच्या अधीन असल्याचे कोर्टाचे म्हणणे असून याप्रकरणी दिवाळीच्या सुटीनंतर सुनावणी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


छठ पुजा वादात सोनू सुदची एन्ट्री

छठपूजेवरुन मुंबईत सुरु असलेल्या वादात आता अभिनेता सोनू सूद यांनीही उडी घेतलीये. मुंबईती जुहू बीचवर छटपूजा साजरी करण्यास मनसेनं विरोध केला असताना आता  15 नोव्हेंबरला संध्याकाळी छटपूजेसाठी जुहू बीचवर येणार असून छटपूजा साजरी करणार असल्याचं सोनू सूदनं म्हटलंय. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय.  त्यामुळे यावरुन आता वाद रंगण्याची शक्यता आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES