SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येणार? प्रश्न ऐकताच संजय राऊत 'स्वगृहा'चा संदर्भ देत म्हणाले, 'जे जे...'

मागील काही दिवसांमध्ये एक दोन नाही तर पाच मोठ्या नेत्यांनी ज्यामध्ये आमदारांपासून ते खासदारांपर्यंतचा समावेश होतो अशा व्यक्तींनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं असल्याने यावर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 12:06 IST | Updated: Nov 13, 2026, 12:30 IST
Image Credit: पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं उत्तर (प्रातिनिधिक फोटो)
Join

राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय सुरु होता. त्यातच आता 'दोन्ही शिवसेना एकत्र येणं' यासंदर्भात अनेक नेत्यांनी भाष्य केल्याने लवकरच राज्याच्या राजकारणात काही भूकंप घडतो की काय अशी शंका उपस्थित केली जात असतानाच संजय राऊतांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. राऊत नेमकं काय म्हणाले आहेत, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल कोण काय म्हणालयं ते जाणून घेऊयात...

दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात एक दोन नाही पाच नेत्यांची विधानं

"दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर सर्वाधिक आनंद मलाच होईल आणि त्यात सामान्य जनतेचे भलेच होईल." असं विधान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गुरुवारी केलं. तसेच, "ही सर्व कार्यकर्त्यांची भावना असली तरी अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे प्रमुख नेतेच घेतील," असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे यांच्या एक दिवस आधीच मंत्री गुलाबराव पाटील यांनीही असेच विधान केले होते. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता फेटाळता येणार नसल्याचं म्हटलं होतं . "आता मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी डब्बा आहे आणि आमचे नेते एकनाथ शिंदे हे इंजिन आहेत. इंजिन जिकडे जाईल, तिकडे डब्बा जाईल," असे सूचक विधान त्यांनी केले होते. या दोघांनी केलेली विधानं कमी म्हणून की काय "राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो," असे सूचक भाष्य करत मंत्री भरत गोगावलेंनी चर्चांना अधिक हवा दिली आहे.

त्यापूर्वी 8 नोव्हेंबर रोजी शिंदेंच्या पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी, "उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र आले, तर तीच आपल्यासाठी आणि शिवसैनिकांसाठी खरी दिवाळी असेल," असं ऐन दिवाळीच्या दिवशी म्हटलेलं. विधान परिषदेतील शिंदेंचे आमदार हेमंत पाटील यांनीही 30 ऑक्टोबर रोजी, "राजकारणात काहीही होऊ शकतं. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल," असं विधान केलेलं.

राऊत काय म्हणाले?

मागील एक ते दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या याच चर्चांवर राऊतांना दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेबद्दल अनेक नेते आणि खास करुन शिंदेंच्या पक्षातील नेते बोलत असल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर राऊत यांनी, "जे जे भाजपसोबत गेले, मग ते राष्ट्रवादीचे आमदार असतील किंवा ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असतील त्यांना तिकडे लाचाराचे जीवन आहे. त्यामुळे त्यांना स्वगृहाची आठवण येणारच," असा टोला लगावला.

"आता ते आठवणी काढतात. संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. बोलण्याचा प्रयत्न करतात. आठवणींचे मोहोळ उठतं त्यांना जुन्या आठवणी उचंबळून येतात," असंही राऊत यांनी म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES