SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'एकनाथ शिंदेंच्या पक्षात तीन 'शिंदे', एकाला अमित शाह ताकद देतात, दुसऱ्याला फडणवीस तर तिसरा...'; राऊतांचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भात मोठं विधान केलं असून त्यांनी सध्या सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलही भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 04, 2026, 12:12 PM IST | Updated: Nov 04, 2026, 12:33 PM IST
Image Credit: राऊतांचा खळबळजनक दावा (प्रातिनिधिक फोटो)
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तीन गट असल्याचं सूचक विधान केलं आहे. या तीन गटांना कोण कोण पाठिंबा देतंय किंवा त्यांचं काय चाललं आहे याबद्दलही राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसेच राऊत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातही महत्त्वाचं भाकित केलं आहे.

तात्पुरते निर्माण केलेले पक्ष

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना, "शिंदे गट राष्ट्रवादी गट हे गट आहेत पक्ष नाहीत," असा टोलाही राऊत यांनी लगावला. "यांना भूमिका नाही. हे अमित शाह यांनी तात्पुरते निर्माण केलेले पक्ष आहेत. दाढीतल्या दाढी हसत असले तरी ते पाठीत वार करण्यासाठी असुलेले दिसतात.  आधी राष्ट्रवादीचा पक्ष कोसळेल, हे तर स्पष्ट दिसतंय," असं भाकित राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

शिंदे गटात तीन शिंदे

"राष्ट्रवादी पक्ष जसा कोसळणार तसा शिंदे गट सुद्धा कोसळणार. एकनाथ शिंदेंच्या पक्षात तीन शिंदे तयार झालेत. आमच्याकडे एक एकनाथ शिंदे होता. शिंदे गटात तीन एकनाथ शिंदे तयार झालेत. एकाला अमित शाह ताकद देत आहेत. एकाला देवेंद्र फडणवीस ताकद देत आहेत. त्यातला एक शिंदे आम्हाला सुद्धा संपर्क साधतो दुःख व्यक्त करतो. हवा बदलतेय सांगतो. त्यांना व्यक्त व्हायला खांदा लागतो. त्यांना नक्कीच पश्चताप होत असेल," असं सूचक विधान राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये तीन गट पडल्याचा दावा करताना केलं.

फडणवीस विरोधी पक्षांत असते तर...

सरकारचे लोक रस्त्यावर मोर्चे काढत आहेत. महाराष्ट्रची लोकशाही सत्ताधाऱ्यांमुळे संकटात आहे.  25 पैकी 13 जागा गोकुळमध्ये सतेज पाटील यांचं समविचारी पॅनेल जिंकलं आहे.  त्यांचा अध्यक्ष होणं गरजेचं आहे.  देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटीलांसारखे बहुमताचा आनादर करून अध्यक्ष समविचारी पॅनेलला करू देत नाही. त्यात एक्स्पर्ट पॅनेल घुसवून गोकुळवर आपला ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोकुळ हे 'अमूल'ला विकायचं आहे. हा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, "फडणवीस यांना नैतिकनेते प्रश्न विचारतो. गोकुळ वाचविण्यासठी तुम्ही मोर्चा काढा. लोकशाहीच्या नावाने षंडगिरी मुख्यमंत्री करत आहेत.  लोकशाहीच्या नावाने तुम्ही मोर्चा काढता.  गोकुळ तुम्हाला गुजरातच्या घशात घालायचं आहे. मोदी, शाह फडणवीस यांचा तिरस्कार का करतात?" असा सवाल राऊतांनी विचारला. "मुख्यमंत्री रिक्षातून फिरतात, मंत्र्याचे कुटुंबिय कोणत्या गाड्यात फिरतात? तोंडाला येईल ते बोलू नका, तुम्ही मुख्यमंत्री आहे. फडणवीस विरोधी पक्षांत असते तर त्यांनी पाच हजार दिल्यानंतर तांडव केला असता," असा टोला शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवरुन राऊतांनी लगावला.  

महापालिकेला जास्त चरबी आली आहे

दिया मिर्जा प्रकरणावरुन न्यायालयाने व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे आदेश दिल्यासंदर्भात बोलताना राऊत यांनी, "कोर्टाने महापालिका सत्ताधाऱ्यांना चपराक मारली आहे. तुम्ही यात धर्म आणू नका असं कोर्ट म्हटलं. भाजपचे चाटम लोकांनी हिंदू-मुस्लिम वाद आणला.  तुमचं सरकार आहे महाराष्ट्रमध्ये आम्ही आहोत ना हिंदुत्ववादी! शिवसेना हिंदुत्ववादी आहे," असं म्हटलं आहे. तसेच, "महापालिकेला जास्त चरबी आलीये, हा शब्द माझा घ्या," असंही राऊत म्हणाले. "जर मुंबई उच्च न्यायालयने सांगितलं तर मग व्हिडिओ आपलोड करावा तर एवढी चरबी कशाला?" असा सवाल राऊत यांनी केला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES