• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'शरद पवार इतक्या वर्षाची तपस्या ....', संजय राऊत NCP विलीनीकरणावर स्पष्टच बोलले, म्हणाले 'सुनील तटकरे यांना...'

'शरद पवार इतक्या वर्षाची तपस्या ....', संजय राऊत NCP विलीनीकरणावर स्पष्टच बोलले, म्हणाले 'सुनील तटकरे यांना...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांची भेट आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना सुरुवात झाली.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 09, 2026, 12:08 IST|Updated: Nov 09, 2026, 12:22 IST
joinshare
'शरद पवार इतक्या वर्षाची तपस्या ....', संजय राऊत NCP विलीनीकरणावर स्पष्टच बोलले, म्हणाले 'सुनील तटकरे यांना...'
Image Credit: संजय राऊत NCP विलीनीकरणावर स्पष्टच बोलले

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांची भेट आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील भेटीगाठी वाढल्या आहेत. खासदार पार्थ पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेत तब्बल अडीच तास चर्चा केली. या भेटींचा राजकीय अर्थ काढला जात असताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.

'मिंधे गटाचे लोक घरगड्यासारखे राहत आहेत'

"विलीनीकरणाबाबतच्या भेटीगाटी आहे असे बोलले जात आहे, पण बोलत कोण आहे?पलीकडच्या बाजूचे जोरजोरात बोलू लागले, कारण ते तिथे खुश नाहीत. ज्यांच्या डोक्यावर लाल दिवे असतील ते खुश राहतील," असं संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपासोबत राहणे म्हणजे लाचारी करणे, स्वाभिमान सोडणे. मिंधे गटाच्या लोकांना विचारा ते घरगड्यासारखे राहत आहेत. आम्ही योग्य वेळी त्यांची साथ आमच्या स्वाभिमानासाठी सोडली असं त्यांनी सांगितलं.

'पवार यांचा पक्ष धर्मांध शक्तीसोबत जाणार नाही'

"पवार यांचा पक्ष धर्मांध शक्तीसोबत जाणार नाही. हा पक्ष यशवंतराव चव्हाण, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचाराचा आहे. पवार भाजपासोबत जातील असं म्हणणारे मूर्ख आहेत. अजित पवार यांचा पक्ष नेतृत्वहीन होत आहे, त्यांचे निर्णय, भवितव्य अमित शाह ठरवत आहेत. 
भाजपचे सोडा तो त्यांचा पक्ष आहे. पण शिवसेना शिंदे गट आणि ही राष्ट्रवादी यांचे भवितव्य अमित शाह ठरवत आहेत. सुनील तटकरे यांना काय महत्त्व मिळत नाही म्हणून ते भूमिका बदलत आहेत," असा दावा त्यांनी केला.

'शरद पवार इतक्या वर्षाची तपस्या मातीमोल करणार नाहीत'

"मी इतर कोणापेक्षाही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचे राजकारण आम्ही जवळून पाहिले आहे. सध्याच्या भारतीय जनता पक्षासोबत आमचा कोणताही वैचारिक संबध नाही. आमचा पक्ष फोडला आणि बिनबुडाच्या लोकांच्या हाती दिला, आम्ही जाणार नाही. शरद पवार यांची इतक्या वर्षाची तपस्या मातीमोल करणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजप काही काम नसले तर अफवा पसरवत असतात. काल हिंगोलीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यावर कोणी बोलत नाही अशी टीका त्यांनी केली.

'विलीनीकरण हा विषय आमच्याकडे नाही'

दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर ते म्हणाले की, "शिवसेना एक आहे दोन नाही. दुसरा अमित शाह यांचा गट आहे. शिवसेना एक आहे उद्धव साहेबांची. दोन राष्ट्रवादीही नाही, शरद पवार साहेब यांची राष्ट्रवादी खरी आहे. विलीनीकरण हा विषय आमच्याकडे नाही, आम्ही आमच्या वैचारिक पायावर उभे आहोत. ते अमित शाह यांनी निर्माण केलेले गट असून भेदरलेले आहेत". 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sharad Pawar
Sanjay Raut
Sunil Tatkare