• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून फडणवीस - शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, दुष्काळावरून शेतकऱ्यांची चेष्टा...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून फडणवीस - शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, दुष्काळावरून शेतकऱ्यांची चेष्टा...

शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर दुष्काळावरून निशाना साधला.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 20, 2026, 09:07 PM IST|Updated: Oct 20, 2026, 09:21 PM IST
joinshare
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून फडणवीस - शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा, दुष्काळावरून शेतकऱ्यांची चेष्टा...
Image Credit: shivsena Uddhav Thackeray

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आजचं दृश्य पाहत बसावं असं आहे. पहिले दिवस मला आठवले. सगळीकडे भगवा माहौल, हाच भगवा आता केवळ महाराष्ट्रच्या विधानसभेवर नाही तर लालकिल्ल्यावर फडकावयाचा आहे. मी पहिले सारखं वातावरण याच्यासाठी बोललो ही आपली ओळख आहे. पवित्र भगवा, जो भगवा शिवरायाने घेतला होता, जो भगवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात दिला होता, तोच हा भगवा, निखळ, पवित्र आणि तेजस्वी आहे. निशानीचा भगवा वेगळा ठेवा. पण आपली ओळख कोणी चोरू शकत नाही. कितीही दरोडेखोर येऊ देत पण आमचा भगवा चोरू शकत नाही. आजचा मेळावा विशेष आहे. एकतरी शिवसेना पक्षप्रमुखांचं जन्मष्ताबदी वर्ष आहे. तसंच आपल्या शिवसेनाच्या दसऱ्या मेळाव्याची जी परंपरा आहे, हरित महोत्सवी मेळावा आहे. माझ्या आजोबांनी प्रबोधनकरांनी जो नवरात्रोत्सव सुरु केला होता, त्याचा देखील जन्मष्ताबदी वर्ष आहे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी पार्कातून शिवसेना प्रमुखांनी आपली शिवगर्जना सर्वप्रथम दिली. पहिला दसरा मेळावा याच शिवतीर्थावर झाला. या मैदानाचं नाव शिवाजी पार्क यालादेखील शंभर वर्ष होतंय. हा संपूर्ण चांगला योगायोग आहे. हा योगायोग तसा कोणी आणला कल्पना नाही, पण शिवसेना पक्षप्रमुखांचं जन्मष्ताबदी वर्ष आणि शिवाजी पार्कचं नामकरण करण्याचे शताब्दीवर्ष म्हणजे मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान हे एकाच वर्षी जन्माला आलं. अशा या पवित्र दिवशी मी आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो.  असेच सोन्यासारखे राहा आणि देशाला सुद्धा परत एकदा तीच झराळी द्या.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,  शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल अनेक जण बोलतात. त्यांनी जी वाक्य बोलली आहेत, ती आजही आपल्या हृदयात कोरून ठेवली आहे. आजच्या घडीला एक वाक्य मला आठवतेय ते म्हणजे मेलेली मनं कधी क्रांती करु शकत नाही. जिंवत माणसासारखे वागा मुर्दासारखे कदापि वागू नका.  दुसरं एक वाक्य त्यांचं होतं क्रांती ही मताची असते आणि शांती ही मुर्दांची असते. मला हेच बोलावसं वाटतं खुराड्यातील कोंबड्यासारख जगू नका.  शिवसेना प्रमुख म्हणायचे एकच दिवस वाघाच जगा. शंभर दिवस शेळीचे जगण्यापेक्षा एकच दिवस असा जागा वाघाच्या रुबाबात आपण जगलो पाहिजे.  खुराड्यातील कोंबड्या कशा असतात आपल्या कापण्यासाठी मालक तिची मान पकडतो, तीच फक्त कलकलाट करते आणि बाकीच्या कोंबड्या तिची मान पकडलीय माझं काय जातंय. म्हणून गपचुप मालक टाकतात ते दाणे टिपत बसते आणि मस्त लठ्ठ होते. पण तिच्या लक्षात येत नाही, आज तिची मान पकडली आहे, उद्या माझी पण मान पकडणार आहे. मग याच्यापेक्षा मुंग्या बऱ्या. इवश्या असतात. मला अनुभव आहे याच शिवाजी पार्कातील. आता तर तुम्ही खुर्च्यांवर बसल्या आहात. पूर्वीचे आपले मेळावे खाली बसून व्हायचे. मग अनेकदा मुंग्या खाली अशायच्या. मुंग्यावरती पाय पडला, हात पडला तर कोणाचे तरी...तेव्हा त्या चिरडल्या जायच्या. त्या चिरडल्या जात आहे पाहून इतर मुंग्या पळत नाहीत.  मग त्या पुसाळून अशा चाव्या घ्यायच्या की जो अवयव त्यांच्या पडेल तो सुजवून टाकतात. आणि पाय कितीही मोठा असला तरी  त्याला पळून जावं लागतं. मुंग्यासारखं जीवन जगलं पाहिजे त्या कोंबड्यासारखं जगण्यापेक्षा. याला म्हणतात स्वाभिमान आणि अभिमान. ते पुढे असंही म्हणालेत की,  आज विषय खूप आहेत. दुष्काळी परिस्थिती कशी आहे, याबद्दल मंचावर इतर नेत्यांनी सांगितलं. सुदैवाने आपल्याला त्याचे चटके फटके बसत नाहीत. मात्र हा दुष्काळ फार मोठा आकराळ विकराळ असणार आहे, किंवाहूना आहेच.  आपल्याकडे एक म्हण आहे, दुष्काळात तेरावा महिना. तसं हे सरकार तीन इंजिनचं सरकार इथे बसलं आहे. नुसत्या घोषणा करतात. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी झाल्यानंतर मी स्वत: तिकडे गेलो होतो. अक्षरशा जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या होत्या. असे गोटे वरती आले होते आणि वरचं जमिनीचे थर वाहून गेलं होतं. विहिरी घाणीने भरल्या होत्या. घरं, दार भांडी - कुंडी पुस्तकं वह्या सगळं आयुष्य वाहून गेलं होतं. तेव्हा या आपल्या मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केलं होतं,  इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज. तीस हजार की एकतीस हजार कोटींचं. ज्यांची जमीन खरडून गेली त्यांना साडेतीन लाख रूपये हेक्टरी किती जणांना दिले. पीक विम्या किती जणांना मिळाला. जेव्हा मी गेल्या वर्षी फिरलो होतो, अक्षरशा शेतकऱ्याची चेष्टा चालू होती. सात रुपये अकरा रुपयांचा चेक देण्यात येत होतं. आणि आतासुद्धा जी मदत केली आहे, हे उत्तर नाहीय. नमो किसानचे दोन हप्ते बाकी आहेत. चार हजारांचे अजून आले नाहीत. ते यायचं बाकी आहे.  आणि पाच हजार कोटी त्यांच्या तोंडावर फेकता येत. विम्यासाठी जे काही निकर्ष लागले होते जे पाच निकर्ष लावले होते ते निकर्ष लावल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या नुकसान भरपाई पोटी विम्याची रक्कम मिळाली असती. ते विम्याचे निकर्षच काढून टाकले. जेणे करुन नुकसान भरपाई देण्याची गरज पडणार नाही. कर्जमाफी जाहीर झाली किती जणांना मिळाली आतापर्यंत कोणालाच माहिती नाहीय.  केंद्रीय पथक येऊन गेलं,  काय पाहिलं किती पंचनामे केले नेमकी मदत किती आणि कधी देणार कोणाला मिळणार, कोणालाच माहिती नाहीय.  शेतकऱ्यांची अवस्था एवढी वाईट आहे, परभणीमध्ये  झरी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक चौदा वर्षांचा पोरगा आहे. शाळेमध्ये जावा लागला. शाळेची सहल होती. हा युवराज वडिलांच्या मागे लागला माझी सहल आहे मला नवीन कपडे पाहिजे. वडील शेतकरी त्यांनी सांगितलं आपलं सोयाबीन विकलं गेलं नाही.  ते विकलं गेलं की पैसे येतील. विकणार असं आणि पैसे येणार कधी. शाळेतील विद्यार्थी चालेल सहलीला मग दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना त्या चिमुकल्याने आत्महत्या केली. पण कोणी गेलं नाही त्याच्याकडे बघायला. हा माझ्या महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्याचा असा जगतोय की त्याची पोरं अशी वागतात. आणि आमच्याकडील शेतकऱ्याचे पोर शेतातून हेलीकॉपटर उडवत चालं आहे. काय थोटांड चालू आहे. काय करत आहात तुम्ही आणि शेतकऱ्यांचं मरण कोणीच बघत नाहीय.  
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Devendra Fadnavis
Eknath Shinde