SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'हे खपवून घेणार नाही', शिंदेंकडून संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे आदेश; निलंबनाची शक्यता - सूत्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 30, 2026, 09:13 AM IST | Updated: Oct 30, 2026, 09:34 AM IST
Image Credit: संजय गायकवाड यांचं निलंबन होणार? शिंदेंकडून कारवाईचे आदेश
Join

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. आपल्या या विधानाने संजय गायकवाड यांनी पक्षांतर्गत नाराजीही ओढावून घेतल्याचं समजत आहे. त्यातच आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय गायकवाड यांचं निलंबन केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचं सूत्रांकडून समजत आहे.

एकनाथ शिंदेंकडून कारवाईचा आदेश

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं समजत आहे. सूत्रांनुसार, आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.

शेतकरी हा अन्नदाता असून त्याच्याविरोधातील वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशारा एकनाथ शिंदेंनी दिला आहे. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होत असल्याची पक्षातील नेत्यांची भावना आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पक्षाचे प्रयत्न सुरू असताना गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आहे. 

संजय गायकवाड यांचं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान

शिवेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड या ना त्या कारणाने नेहमीच वादात असतात. कोणत्याही विषयावर बेताल बडबड करायची आणि वाद ओढवून घ्यायचा ही गायकवाड यांची जुनी सवय आहे. आत्महत्या करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांबाबत संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. आत्महत्या करणा-या शेतक-याच्या अंत्यविधीला कोणीही जाऊ नये. त्यांचे मृतदेह जनावरं खातील तेव्हा शेतकऱ्यांना समजेल, असं विधान संजय गायकवाडांनी केलं होतं.

संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय.. शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या गायकवाड यांच्यावर शेतकरी नेत्यांनी टीकास्त्र डागलंय.. संजय गायकवाड यांच्या या विधानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागावी अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली होती. तर शेतकऱ्यांबद्दल असा विचार करणारं सरकार राज्यात असल्याचं दुर्दैव असल्याचं म्हणत
ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशीवचे आमदार कैलास पाटील यांनीही गायकवाड आणि सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शेतकरी नेते आणि विरोधकांसोबतच गायकवाडांना त्यांच्याच पक्षाचतील नेत्यांनाही फटकारलं आहे. लोकप्रतिनिधींनी अशी वक्तव्य करायला नको असं म्हणत आमदार निलेश राणे यांनी संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. तर आमदार कोणत्या पक्षाचाही असो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं वक्तव्य करणं योग्य नसल्याचं म्हणत आमदार अब्दूल सत्तार यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES