• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'अमित शाहांनी मध्यरात्री अजितदादांच्या पुतळ्यासमोर...', उद्धव ठाकरेंनी दिलं टीकेला उत्तर; '...तेव्हा बाथरूममध्ये जाऊन...'

'अमित शाहांनी मध्यरात्री अजितदादांच्या पुतळ्यासमोर...', उद्धव ठाकरेंनी दिलं टीकेला उत्तर; '...तेव्हा बाथरूममध्ये जाऊन...'

उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता अमित शाहांनी सोमवारी पुण्यातील जाहीर कार्यक्रमामध्ये भाषणामधून कोरोना काळाचा उल्लेख करत खोचक विधान केलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 17, 2026, 13:36 IST|Updated: Nov 17, 2026, 14:06 IST
joinshare
'अमित शाहांनी मध्यरात्री अजितदादांच्या पुतळ्यासमोर...', उद्धव ठाकरेंनी दिलं टीकेला उत्तर; '...तेव्हा बाथरूममध्ये जाऊन...'
Image Credit: कोरोना काळातील संदर्भ देत केलेल्या टीकेला ठाकरेंचं उत्तर (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 14 व्या पुण्यतिथीनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळी अभिवादनासाठी आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी पुण्यात माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याच्या लोकार्पणादरम्यान केलेल्या विधानाचा समाचार घेतला. कोरोना काळात राज्याचे मुख्यमंत्री उपलब्ध नसायचे तेव्हा रोज सकाळी सात वाजता माझं आणि अजित पवारांचं बोलणं व्हायचं, असं अमित शाहांनी म्हटलं होतं. या माध्यमातून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. याच टीकेला उद्धव यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

अजितदादा हयातीत असताना आरोप केले अन् काल...

अमित शाहांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारलं असताना उद्धव ठाकरेंनी, अमित शाह किती दिवसांनी समोर आले असा खोचक सवाल विचारताना जेन झी आंदोलनादरम्यान कुठे होता असा प्रश्न विचारला. "अमित शहा किती दिवसांनी अवतीर्ण झाले? जेन झी आंदोलन सुरू असताना कुठे होते? चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्र्यांनी हे बोलू नये," असा टोला उद्धव यांनी लगावला. "अजितदादा असताना त्यांच्यावर आरोप केले. त्याच अजितदादांच्या स्मारकाचं लोकार्पण काल त्यांनी केलं. अजितदादा हयातीत असताना, आरोप केले आणि काल नाक रगडलं," असा टोला ठाकरेंनी अमित शाहांनी अजित पवारांसंदर्भात केलेल्या भाषणावरुन लगावला.  

अमित शाहांनी मध्यरात्री किंवा केव्हाही...

"देशातील कोरोना काळात, देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री असं मी नाही, त्या संतांनी सांगितलं. निर्बुध माणसासमोर मी काही फार बोलत नाही. मणिपूर किंवा इतर ठिकाणी, अरुणाचलमध्ये ज्या घटना घडत आहेत, तिथे गृहमंत्र्याने जायला हवं पण चकात्या पिटणाऱ्या माणसाने बोलू नये. अमित शाहांनी मध्यरात्री किंवा केव्हाही जाऊन अजितदादांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागायला हवी," असा खोचक सल्ला ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिला. 

स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं काही नाही

"उत्तर प्रदेशात गंगेत, गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या. महाराष्ट्रात काय स्थिती होती हे सगळ्यांनी पाहिलं. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सुरू आहेत. कोरोना काळात मुंबईतून लोक तिकडे गेले, पण तिथे जाऊन चिडले, कारण मुंबईत चांगली स्थिती होती हे त्यांना जाणवलं. उत्तर प्रदेशात 70 बालकं ऑक्सिजन नसल्यामुळे तडफडून मेली होती. स्वतःच कर्तृत्व सांगण्यासारखं काही नाही म्हणून खोटं बोलून चालवलं जात आहे. जेन झी आंदोलनावर उत्तर द्या म्हणत होते, तेव्हा बाथरूममध्ये जाऊन बसत होते," असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.

अमित शाह यांचा थापाड्या असा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारला असताना, "त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, ते घेतील. माझं मत विचारत घेणार असतील तर बोलू. अमित शहाचं वाक्य ब्रम्ह वाक्य नाही, थापाड्याचे वाक्य आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Ajit Pawar
Amit Shah
Uddhav Thackeray