• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /'तुझा आता गेमच करतो', गुंडाने तरुणाला दिली धमकी अन् नंतर...; धक्कादायक घटनेने नागपूर हादरलं

'तुझा आता गेमच करतो', गुंडाने तरुणाला दिली धमकी अन् नंतर...; धक्कादायक घटनेने नागपूर हादरलं

नागपुरात कुख्यात गुंडाने तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 12, 2026, 20:59 IST|Updated: Nov 12, 2026, 21:03 IST
joinshare
'तुझा आता गेमच करतो', गुंडाने तरुणाला दिली धमकी अन् नंतर...; धक्कादायक घटनेने नागपूर हादरलं
Image Credit: 'तेरा गेम करूंगा' म्हणत तरुणावर चाकूहल्ला (File Photo)

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नागपुरात कुख्यात गुंडाने तरुणावर चाकूने हल्ला केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. 'तू मेरी बात सुनता नही, तेरा गेम करता हूं', असे म्हणत गुंडाने तरुणावर चाकूने हल्ला करून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला, मेहंदीबाग रेल्वे मार्गाजवळ ही घटना घडली आहे.  या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. ओमकार ऊर्फ ओमी सतीश यादव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

करण प्रकाश जाधव हा कामावरून घरी परतत असताना घराजवळील गजानन मंदिर परिसरात ओमकारने त्याला अडवले. त्यानंतर रेल्वे लाईनच्या दिशेने फिरून येण्यास सांगत त्याला मेहंदीबाग रेल्वे मार्गावर नेले. तिथे पोहोचल्यानंतर ओमकारने 'तू आजकल मेरी बात नही सुनता है, आज तेरा गेम करता हूं', असे म्हणत करणसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

काही वेळातच ओमकारने चाकू बाहेर काढल्याने जीव वाचविण्यासाठी करणने तेथून पळ काढला.  मात्र, आरोपीने पाठलाग करून त्याला पकडले आणि चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी ओमकार यादव याला अटक केली. पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती यशोधरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विवेकानंद भारती यांनी दिली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nagpur
crime