• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /मुलीच्या शरिरावर खुणा दिसल्याने महिलेने घरात लावला CCTV; व्हिडीओतून हादरवणारं सत्य उघड; तिचा बापच रोज तिच्यावर....; एक वर्ष सुरु होतं रेकॉर्डिंग

मुलीच्या शरिरावर खुणा दिसल्याने महिलेने घरात लावला CCTV; व्हिडीओतून हादरवणारं सत्य उघड; तिचा बापच रोज तिच्यावर....; एक वर्ष सुरु होतं रेकॉर्डिंग

नागपुरात आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 12:36 IST|Updated: Nov 11, 2026, 12:44 IST
joinshare
मुलीच्या शरिरावर खुणा दिसल्याने महिलेने घरात लावला CCTV; व्हिडीओतून हादरवणारं सत्य उघड; तिचा बापच रोज तिच्यावर....; एक वर्ष सुरु होतं रेकॉर्डिंग
Image Credit: नागपुरात आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय आरोपी पित्याला अटक

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नागपुरात पित्यानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा लैगिक अत्याचार वारंवार केला जात होता. आरोपी पिता राहत्या घरात हे कृत्य करत होता. पत्नीने घरात सीसीटीव्ही लागल्याने पतीचा खरा चेहरा उघड झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.  आरोपी 45 वर्षांचा असून, पीडित मुलगी फक्त 10 वर्षांची आहे.

मुलीच्या आईला तिच्या शरिरावर काही जखमा, वण दिसल्याने पतीच्या वागणुकीबद्दल संशय आला. यामुळे तिने गुप्तपणे कोणालाही कळू न देता घरात टीव्हीच्या मागे सीसीटीव्ही लावला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती घरातील हालचालींवर लक्ष ठेवत होती. तिचा पती जेसीबी चालक म्हणून काम करतो.  

32 वर्षीय महिलेने सांगितलं आहे की, तिला मुलीच्या शरिरावर संसर्ग होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. यामुळे तिला मुलीवर लैंगिक अत्याचार होत असल्याचा संशय आला. तिने यानंतर घरात सीसीटीव्ही लावण्याचं ठरवलं. पण हे करण्याआधी तिने यासंदर्भात आपल्या मित्रांशी चर्चा केली.

या सीसीटीव्हीत घरातील तब्बल एक वर्षातील सर्व हालचाली कैद झाल्या. या सीसीटीव्हीच्या लाईव्ह फिडचा अॅक्सेस महिलेच्या मैत्रिणीकडे होता. तिच्या मोबाईलवर सर्व लाईव्ह फिड दिसत होतं. या मैत्रिणीने सर्व रेकॉर्डिंगवर सातत्याने लक्ष ठेवलं आणि जेव्हा आरोपी मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा तेव्हा ते फुटेज सेव्ह करायची. हे फुटेज अखेर मुलीच्या आईच्या हाती लागलं.

हे सीसीटीव्ही पाहिल्यानंतर मुलीच्या आईला धक्का बसला. तिने यानंतर आपल्या 10 वर्षीय मुलीशी चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यावेळी तिला वडिल इच्छा नसतानाही वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचं तिने सांगितलं. इतकंच नाही तर आपण जर याबद्दल कोणाला सांगितलं तर आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती असाही खुलासा तिने केला. यामुळेच आपण याबद्दल मौन बाळगल्याचं तिने आईला सांगितलं.

यानंतर महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, गंभीर लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कथित गुन्हे 26 ऑगस्टपासून घडत होते आणि सर्वात अलीकडील घटना 9 नोव्हेंबर रोजी घडल्याचं समोर आलं आहे. पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र बोबडे यांनी सांगितले की, "सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरेल."

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Nagpur