• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /एका मांजरीच्या मृत्यूने नागपुरामध्ये भीतीचं वातावरण! दिवाळीच्या दिवशीच हे मांजर...; गूढ वाढलं, तपास सुरु

एका मांजरीच्या मृत्यूने नागपुरामध्ये भीतीचं वातावरण! दिवाळीच्या दिवशीच हे मांजर...; गूढ वाढलं, तपास सुरु

संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारा हा प्रकार ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास समोर आला आणि एकच खळबळ उडाली. नक्की घडलं काय जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 14:13 IST|Updated: Nov 11, 2026, 14:22 IST
joinshare
एका मांजरीच्या मृत्यूने नागपुरामध्ये भीतीचं वातावरण! दिवाळीच्या दिवशीच हे मांजर...; गूढ वाढलं, तपास सुरु
Image Credit: स्थानिकांमध्ये भीतीचं वातारवण (प्रातिनिधिक फोटो सौजन्य एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव... मात्र, याच दिवशी नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जादूटोण्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची चर्चा रंगली असल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र या साऱ्या प्रकारामागे नेमकं कोण आहे याचं गूढ कायम आहे.

नक्की कुठे घडला हा सारा प्रकार?

नागपुरमधील सर्वश्रीनगर परिसरात एका मांजरीला झाडाला फास लावून ठार मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी 8 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या परिसरात ही घटना उघडकीस आली आहे.

मांजराला झाडावरुन उतरवून रुग्णालयात नेलं पण...

स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळताच प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मांजरीला झाडावरून खाली उतरवले. तिला तातडीने जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गळ्याला फास लागून श्वास गुदमरल्यामुळे मांजरीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र हे कृत्य केलं कोणी याची माहिती समोर आलेली नाही.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे, जादूटोण्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने काळी जादू किंवा अघोरी प्रथेसाठी मांजरीचा असा निर्घृणप्रकारे बळी दिला असावा, अशी चर्चा परिसरामध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. या घटनेनंतर प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून तपास सुरु

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मूक्या प्राण्याची इतक्या क्रूरपणे कोणी आणि कोणत्या कारणासाठी हत्या केली हे अजून समोर आलेलं नाही.  अंधश्रद्धेच्या अँगलला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात असून एवढा सारा प्रकार होत असताना कोणी आरोपीला पाहिलं कसं नाही असा प्रश्नही स्थानिकांच्या चर्चेत ऐकायला मिळतो. आता पोलीस या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nagpur
crime