• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नागपूर
  • /'ही कृती मनाला स्पर्श करणारी,' पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, 'यातून अधोरेखित होते की..'

'ही कृती मनाला स्पर्श करणारी,' पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, 'यातून अधोरेखित होते की..'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 10:40 IST|Updated: Nov 08, 2026, 10:47 IST
joinshare
'ही कृती मनाला स्पर्श करणारी,' पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक, 'यातून अधोरेखित होते की..'
Image Credit: पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली असल्याने महायुती सरकारने नेत्यांना शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत त्यांना दिलासा देण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याच पार्श्वभूमीवर बळीराजासोबत दिवाळी साजरी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे त्यांनी शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला आणि त्यांच्यासह दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांची ही कृती मनाला स्पर्श कऱणारी असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींकडून फडणवीसांचं कौतुक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि  त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे,  हे या कृतीतून अधोरेखित होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

This gesture by Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji, of spending Diwali with farmers in Lohari Sawanga village (Narkhed, Nagpur) and staying at the residence of Arunabai and Rambhau Balpande is very touching. It underlines the spirit of compassion with which the NDA Government in Maharashtra is working for the farmers and ensuring their well-being. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी लोहारी सावंगा गावात (नरखेड, नागपूर) शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि त्यांनी अरुणाबाई आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम ही केला, ही त्यांची कृती मनाला स्पर्श करणारी आहे. महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने कार्य करत आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे, हे या कृतीतून अधोरेखित होते.

— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026

 

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. "हेमाडपंथी शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि कार नदीमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावी आज शेतकरी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाचे दुःख, त्याच्या व्यथा आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता जाणून घेताना मन भरून आले. आज मी येथील शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. बालपांडे कुटुंबाने अत्यंत आपुलकीने केलेल्या स्वागताने मन अक्षरशः भारावून गेले आहे. त्यांच्या प्रेमात, जिव्हाळ्यात आणि आपलेपणात एक विलक्षण भावनिक ओलावा आहे," असं ते म्हणाले आहेत.

 

शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी! हेमाडपंथी शिवमंदिराचा ऐतिहासिक वारसा आणि कार नदीमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य अशा वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावी आज शेतकरी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. दुष्काळाचा सामना करणाऱ्या बळीराजाचे दुःख, त्याच्या व्यथा आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता जाणून घेताना मन भरून आले. आज मी येथील शेतकरी अरुणाबाई बालपांडे आणि रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी आहे. बालपांडे कुटुंबाने अत्यंत आपुलकीने केलेल्या स्वागताने मन अक्षरशः भारावून गेले आहे. त्यांच्या प्रेमात, जिव्हाळ्यात आणि आपलेपणात एक विलक्षण भावनिक ओलावा आहे. देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे करपलेली पिके, निर्माण झालेली आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणाची चिंता त्यांच्या मनात आहे. लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांशी या विषयांवर संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळताना अनुभवला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," हे त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले. माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे पीक म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर ते त्याच्या संपूर्ण कुटुंबाने वर्षभर केलेल्या कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रत्येक पिकामागे कुटुंबाच्या भविष्याची आशा असते आणि प्रत्येक हंगामामागे समृद्धीचे स्वप्न असते. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जेव्हा पीक उद्ध्वस्त होते तेव्हा शेतकऱ्यांच्या भविष्यावरही संकट येते. आज हे दुःख जवळून अनुभवले. म्हणूनच, केवळ मंत्रालयातील बैठका, निर्णय, योजना किंवा आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता, बळीराजाच्या शेजारी बसून त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याचे अश्रू पुसणे आणि त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आधाराचा हात देणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य असेल त्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल. काटोल आणि नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, निर्यातीसमोरील नव्या आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून संत्री आणि मोसंबीवर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. @cbawankule @AshishRDeshmukh #Maharashtra #DiwaliWithFarmers #Nagpur

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 7, 2026

 

"देशभरात दिवाळीचा उत्साह असताना राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे करपलेली पिके, निर्माण झालेली आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणाची चिंता त्यांच्या मनात आहे. लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांशी या विषयांवर संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हळूहळू निवळताना अनुभवला. "साहेब, तुम्ही थेट आमच्या गावात आलात, आमच्या सुख-दुःखात सहभागी झालात, यातच आमचे अर्धे दुःख हलके झाले," हे त्यांचे शब्द मनाला स्पर्शून गेले," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

"माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचे पीक म्हणजे केवळ उत्पादन नाही, तर ते त्याच्या संपूर्ण कुटुंबाने वर्षभर केलेल्या कष्टांचे, त्यागाचे आणि स्वप्नांचे प्रतीक आहे. प्रत्येक पिकामागे कुटुंबाच्या भविष्याची आशा असते आणि प्रत्येक हंगामामागे समृद्धीचे स्वप्न असते. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे जेव्हा पीक उद्ध्वस्त होते तेव्हा शेतकऱ्यांच्या भविष्यावरही संकट येते. आज हे दुःख जवळून अनुभवले. म्हणूनच, केवळ मंत्रालयातील बैठका, निर्णय, योजना किंवा आर्थिक सहाय्यापुरते मर्यादित न राहता, बळीराजाच्या शेजारी बसून त्याच्या अडचणी जाणून घेणे, त्याचे अश्रू पुसणे आणि त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी आधाराचा हात देणे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे," असं त्यांनी सांगितलं आहे.

"रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य असेल त्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल. काटोल आणि नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, निर्यातीसमोरील नव्या आंतरराष्ट्रीय आव्हानांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून संत्री आणि मोसंबीवर प्रक्रिया करण्यासाठी मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल," अशी माहिती त्यांनी दिली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Devendra Fadnavis