SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

समृद्धी महामार्गावरील अपघातात महिंद्राची MPV चक्काचूर, ड्रायव्हरला डुलकी लागली अन् डोळ्यादेखत 2 लेकीसमोर वडिलांनी सोडला प्राण

समृध्दी महामार्गावरील नागपूरलेनवरील वनोजा ते कारंजा दरम्यानच्या लोहाराजवळ कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघं जण जखमी आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 08:35 IST | Updated: Nov 29, 2026, 08:40 IST
Image Credit: samruddhi mahamarga accident
Join

वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कार आणि ट्रकची भीषण धडक होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये 20 वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर आहे. लोहाराजवळ संध्याकाळी हा अपघात घडला आहे.

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या सिन्हा कुटुंबाच्या कारला नागपूर लेनवर समोर जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. कार चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार ट्रकवर मागून आदळल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या स्टील गार्डला धडकली. या भीषण अपघातात कारचालक विकास सिन्हा आणि एका वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अनया सिन्हा (20), आनंदा सिन्हा आणि युवा सिन्हा (10) हे तिघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी अनयासह तिघांनाही पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हेसुद्धा वाचा -  राजरप्पा मंदिर दर्शनाला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात, 4 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार या कारमधील कुटुंब सिन्हा हे मुंबईतील रहिवाशी होते. या कुटुंबातील पाच सदस्य मुंबईहून नागपूरकडे जात असताना हा भीषण अपघातात झाला.  वाशिमच्या वनोजा ते कारंजा दरम्यानच्या लोहारा जवळ विकास सिंग यांना डुलकी लागली आणि हा भीषण अपघात झाला.

दरम्यान याच महिन्यांच्या 23 नोव्हेंबरला  समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघाताचेही कारण चालकाला डुलकी लागल्याने झाला होता. यातही दोन निष्पाप प्रवाशांचा जीव गेला तर 30 जण जखमी झाले होते.

 

सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 जवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बस पुलाच्या कठड्यावर जोरात आदळून जागेवरच पलटी होऊन अपघात झाला. ज्या पुलावर ही बस पलटी झाली, त्याच्या बाजूला अवघ्या काही फुटांवर खोल खाई होती, नशिबाने मोठी जीवितहानी टळली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES