• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /राजरप्पा मंदिर दर्शनाला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात, 4 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

राजरप्पा मंदिर दर्शनाला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात, 4 मुलांसह 13 जणांचा मृत्यू

रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चार मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 07:52 IST|Updated: Nov 29, 2026, 07:59 IST
joinshare
राजरप्पा मंदिर दर्शनाला जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात, 4 मुलांसह 13 जणांचा मृत्यू
Image Credit: Road Accident Ranchi Patna Highway

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून भीषण रस्ते अपघाताचा धक्कादायक बातमी समोर आली आहे. रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर भाविक देव दर्शनासाठी जात असताना कारला अपघात झाला आहे. हे लोक प्रसिद्ध धार्मिक स्थळ राजरप्पा मंदिराकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सर्व 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात चार मुलांच्या मृत्यूमुळे ही घटना अधिकच मन हेलावून टाकणारी आहे. आयुष्याची अजून सुरुवातही झाली नाही आणि जीवनाचा शेवटही झाला. या भीषण अपघात घटनेत महिला, पुरुष आणि मुलांसह तेरा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मंदिराला भेट देण्यासाठी निघालेला प्रवास एका अशा शोकांतिकेत बदलला, जे कुटुंबे कधीही विसरणार नाहीत. पोलिसांच्या माहितीनुसार, राजरप्पा मंदिराकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर गाडीचा अपघात झाला.

हेसुद्धा वाचा -  पत्नीला पती वारंवार माहेरी पाठवायचा, तिला आला संशय; घरात CCTV लावलं अन् मग जे समोर आलं ते धक्कादायक

 

Ramgarh, Jharkhand: 13 people were killed in a road accident involving a car carrying devotees to Rajrappa Temple on the Ranchi-Patna National Highway. The deceased include four children, four women and five men. (Source: Police) https://t.co/NboM6r23kG

— IANS (@ians_india) November 29, 2026

 

एकाच गावातील इतक्या लोकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एनएच-33 वर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ कारला एका अज्ञात वाहनाशी टक्कर झाली.  रामगढचे एसडीपीओ आलोक रंजन यांनी माहिती दिली की, मृत व्यक्ती नालंदा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याजवळ सापडलेल्या आधार कार्डांवरून काहींची ओळख पटली आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दिल्लीतही मोठी घटना!

दिल्लीत आज पहाटे एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. शाहदरा इथे काल रात्री उशिरा लागलेल्या आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीररित्या भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर एक रिक्षा चार्जिंग असताना ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण दुर्दैवाने यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Accident
Breaking News