SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'... तर शरद पवारांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन'; विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न? म्हणाले, 'सत्ता एका ठिकाणी...'

शरद पवार हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे विचारांनी सोबती राहिले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 29, 2026, 12:20 IST | Updated: Nov 29, 2026, 12:22 IST
Image Credit: Sharad Pawar did not support the delimitation then I will apologize him says vijay Wadettiwar
Join

'पवार साहेबांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही तर त्यांची जाहिर ही माफी मागेन. पवार साहेबांच्या पायावर डोकं ठेवून ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांची माफी मागेन,' असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याची भूमिका जाहीर करताच काँग्रेसने उघडपणे शरद पवारांवर टीका केली होती. विजय वडेट्टीवार यांनीही संतप्त होत, शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचा, अशी जहरी टीका केली होती.

विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळं राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर देत टीका केली होती. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांना दुखावण्याचा प्रश्नच नाही, असं म्हटलं आहे. नागपुरात माध्यमांसमोर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

'शरद पवारांना दुखावण्याचा प्रश्नच नाही. आमचा त्यांना दुखवण्याचा हेतू नव्हता, जनतेची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीपक्षाकडून भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ती मांडण्याचा प्रयत्न केला. जर पवार साहेबांनी डिलिमिटेशनला पाठिंबा दिला नाही तर त्यांची जाहिरही माफी मागेन. पवार साहेबांच्या पायावर डोकं ठेवून ही लोकशाही वाचवण्यासाठी त्यांची माफी मागेन,' असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

'पवारांना आमची हात जोडून विनंती राहणार आहे. आम्ही माफी मागू. शरद पवारांनी या बिलाला पाठिंबा देऊ नये, अशी आमची विनंती असणार आहे. पवार साहेबांना भेटून या सगळ्या विधेयकाची माहिती त्यांना देणार,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

'शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला, तर त्यामध्ये त्यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. अन्यथा उद्या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून नव्हे, तर गुलाम म्हणून आपल्याला सामोरे जावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे,' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

'मला विश्वास आहे की आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीनंतर, आम्हाला माहिती नाही भेटीगाठी आहे की नाही, तुमच्या माध्यमातून ऐकतोय. या भेटीगाठीतून चांगला मार्ग निघावा. देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल करताना दिसतो. ते थांबावं लोकशाही या देशात दिर्घकाळ नांदावी. सत्ता एका ठिकाणी स्थिर राहू नये,  सत्ता बदलत राहिली पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

'काँग्रेसमधून कोणताही  खासदार फुटणार नाही'

काँग्रेसचे खासदार आमच्यासोबत आहेत. काँग्रेसचे खासदार डिलिमिटेशनच्या बाजूने असते, तर हे बिल केव्हाच पास झाले असते. काँग्रेसमधून कुठलाही खासदार फुटणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे, असं म्हणत त्यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES