भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील मिन्सी–तिर्री मार्गावरील तिर्री गावात बिबट्याच्या हल्ल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरात पाळण्यात शांतपणे झोपलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक झडप घालून त्याला उचलून नेले. आई घरात स्वयंपाक करीत असतानाच सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बाळाला बिबट्याने उचलून नेल्याचे लक्षात येताच आईने आरडाओरड करीत त्याचा पाठलाग केला.
ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केली. अखेर जवळच असलेल्या तुरीच्या शेतात बिबट्याने बालकाला सोडले; मात्र तोपर्यंत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आईच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण तिर्री गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात एकाच वेळी 5 वाघ दिसून आले. शाळेतून परतणाऱ्या शिक्षकांना हे वाघ दिसून आलेत.. मेळघाटातील कोअर भागातील ढाकणा-कोहा चेक पोस्ट जवळ रस्ता ओलांडताना हे वाघ दिसून आले. शिक्षकांनी मोबाईल कॅमे-यात या वाघांचं चित्रिकरण केले. मेळघाटात अनेकदा नागरिकांना वाघांचा संचार पाहायला मिळतो मात्र एकाच वेळी पाच वाघ फिरताना दिसल्याने मेळघाटातील वाघांची संख्या वाढली असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगांव जवळ भोरटेक शेत शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने अथक प्रयत्ना नंतर सुरक्षीत रित्या बाहेर काढले या थरक रेस्क्यू ऑपरेशन मुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास श्वास सोडला आज भोरटेक शिवारातील शेत गट क्रमांक 11 मधील अशोकराव देशमुख यांच्या शेतातील विहीरीत बिबट्या जिवंत अवस्थेत आढळून आला होता विहिरीत अटकलेल्या बिबट्याने मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत असल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधीत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. विहिरीत पिंजरा सोडून पडलेल्या बिबट्या बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्ना यश आले. आणि बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी परीसरातील नागरिकांनी गर्दी केली होती या रेस्क्यू ऑपरेशनमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.