• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /बापरे! नाशिकमध्ये AQI निर्देशांक 1007 वर पोहचला; हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीत

बापरे! नाशिकमध्ये AQI निर्देशांक 1007 वर पोहचला; हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीत

दिवाळीच्या फटाक्यांमुळे नाशिकमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे.. शहराचा AQI निर्देशांक 964 वर, तर समतानगरमध्ये 1007 वर पोहोचल्याची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषणात जवळपास तिप्पट वाढ झाली असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 10, 2026, 21:18 IST|Updated: Nov 10, 2026, 21:23 IST
joinshare
बापरे! नाशिकमध्ये AQI निर्देशांक 1007 वर पोहचला; हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीत

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिक :  दिवाळीच्या आनंदोत्सवात नाशिककरांनी फोडलेल्या फटाक्यांमुळे शहराच्या हवेचा अक्षरशः श्वास कोंडला आहे. दिवाळी पाडव्याच्या रात्री अवघ्या अर्ध्या तासात नाशिकच्या हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली असून, शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात AQI थेट 964 वर पोहोचल्याची धक्कादायक नोंद झाली आहे. एका ठिकाणी तर हाच निर्देशांक 1007 वर पोहचला होता.  नाशिकमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. 

यंदा दिवाळीच्या फटाक्यांमुळे नाशिकमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे.  विशेष म्हणजे, गेल्या वर्षी दिवाळीत हाच निर्देशांक 354 होता. म्हणजेच यंदा प्रदूषणात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. नाशिकच्या समतानगर परिसरात तर AQI ने 1007 चा टप्पा गाठला.

शहरातील अनेक भागांमध्ये प्रदूषणाची पातळी 700 ते 800 च्या पुढे गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर, सूक्ष्म धूलिकण आणि विषारी घटकांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना मोठा धोका निर्माण झाला आहे. दिवाळीचा उत्साह साजरा करताना आपण आपल्या आरोग्याशीच खेळतोय का? असा गंभीर प्रश्न या प्रदूषणाच्या आकडेवारीने उपस्थित केला जात आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे चित्र समोर येत आहे. 1 नोव्हेंबरला अवघा 89 असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी थेट सरासरी 700 च्या दरम्यान पोहोचला आहे. यामुळे नाशिकची हवा सध्या 'मध्यम श्रेणीत असली, तरी ती खराब श्रेणीच्या उंबरठ्याकडे सरकत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नाशिककरांचा श्वास गुदमरतोय.

दिवाळीच्या पहिल्या टप्प्यात फटाक्यांचा आवाज तुलनेने कमी असला, तरी लक्ष्मीपूजनाच्या दुपारी आणि सायंकाळी हवेतील धुलीकणांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली खोदकामे, रस्त्यांवरील धूळ, वाहतूक आणि दिवाळीतील फटाक्यांचा धूर यांचा एकत्रित परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. शहरात - PM 2.5 चे प्रमाण 558, PM 10 चे 670 (पीएम 2.5 (अतिसूक्ष्म धुलीकण) आणि पीएम 10 (मोठे धुलीकण) हे प्रमुख प्रदूषक म्हणून नोंदले गेले आहेत. 

सणासुदीमुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली असल्याने प्रदूषणात आणखी भर पडली आहे. औद्योगिक आस्थापनांना सुट्या असल्याने त्यातून होणारे प्रदूषण कमी असले तरी, वाढती बांधकामे आणि धूळ हे घटक त्रासदायक ठरत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरातील पाच ठिकाणी आवाजाची मोजणी सुरू असली तरी, ढासळत्या हवेमुळे दमा किंवा श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नाशिकमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या खोदकामामुळे हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण पाहायला मिळाली. सध्या हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी ती खराब श्रेणीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
Weather
Weather News