अभिजीत दिपके : गोकुळच्या 4 संचालकांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 4 संचालकांविरोधात सतेज पाटील यांनी तीव्र आंदोलन केले. शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा दिलेला अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक असल्याने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील यांनी देखील 4 संचालकांच्या नियुक्तीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यानंतर आता कॉकरोज जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
जी मुलं आंदोलन करत होते त्यांना मुख्यमंत्री अराजकवादी तत्व म्हणत होते, असंवैधानिक तत्व म्हणत होते खास करून आम्हाला कॉकरोज जनता पार्टीला. पण कोल्हापूरमध्ये गोकुळच्या निवडणुकीत जे काही झालं ते आपण सगळे बघतोय. कशाप्रकारे निवडणूक हारल्यानंतरही भाजपने कसे त्यांच्या सरकारने चार अजून मेंबर्स अपॉइंट करून एक होस्टाईल टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला. ज्यानेकरून निवडणूक हारल्यानंतरही जो कंट्रोल आहे त्या कॉर्पोरेशनचा तो भाजपकडे असला पाहिजे अंस गंभीर आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.
मुख्यमंत्री साहेबांना मला विचारायचं अराजकवादी कोण आहे? अराजकवादी आम्ही आहोत की तुम्ही आहात? जे जनतेचा कौल मानत नाहीये, अराजकवादी आम्ही आहोत का तुम्ही आहात? जे निवडणूक हारल्यानंतरही संविधानाच्या विरोधात जाऊन त्या कॉर्पोरेशनचा एक होस्टाईल टेकओवर करण्याचा डाव आहे. निवडणूक हारल्यानंतरही काही करून स्वतःची सत्ता स्थापन करायला बघत आहेत .
हे कधीपर्यंत चालणार आहे? विचार करा जर एका दूध संघाच्या निवडणुकीसाठी हे लोक या पातळीवर पडू शकतात. तर जिथे जिथे राज्यस्तरीय निवडणुका होतात तिथे हे ज्ञानेश कुमारच्या मदतीने कुठल्या लेव्हलला मॅंडेट चोरी करत असतील. कोल्हापूरच्या सगळ्या शेतकऱ्यांना माझा सलाम आहे. जे रस्त्यावर उतरून या गैरसंविधानिक आणि अराजक प्रयत्नांचा विरोध करत आहेत. काही झालं तरी जनतेचा जो कौल आहे तो शेवटचा कौल असला पाहिजे आणि त्याचं होस्टाईल टेकओव्हर होता कामा नये असं अभिजीत दिपके म्हणाले.