गोकुळ निवडणूक : महाराष्ट्रातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. गोकुळवर महायुतीची सत्ता आली आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांची निवड झाली आहे. समविचारीच्या शशिकांत पाटील चुयेकरांचा पराभव झाला आहे. राजेश पाटील यांना 16 तर चुयेकरांना 13 मतं मिळाली आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या अध्यपद वाटून घेणार असल्याचे जाहीर केले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला. गोकुळ दुध संघ महायुतीच्या ताब्यात गेला आहे. महायुतीच्या उमेदवाराला 29 पैकी इतकी 16 मत तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चूयेकर यांना 13 इतकी मत. समविचारी पॅनेलचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव, समविचारी आघाडीला मोठा धक्का.
पहिल्या टप्यात निवडून आलेल्या संचालकांची मतमोजणी पार पाडली, त्यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मत मिळाली तर राजेश पाटील याना 12 मत मिळाली. दुसऱ्या टप्यात शासन नियुक्त मतमोजणीत राजेश पाटील याना 16 मत तर शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मत मिळाली.
मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांनी निकालानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी अध्यक्षपदाचा फॉर्म्युला देखील जाहीर केला. साडे पाच लाख लोकांच्या हिताचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने संभ्रम पसरवला. न्यायालयाने चपराक दिली आणि त्यांना घरी पाठवले. दूध उत्पादकांना अधिकचा दर देण्याचा प्रयत्न करणार अस धनंजय महाडिक म्हणाले.
अध्यपदाचा फॉर्म्युला ठरवला असून पहिला राष्ट्रवादीचा अध्यक्ष नंतर पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय घेऊ असं महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले.
वैधानिक संकट दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी केला. पहिला अध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादीला दिला. महायुतीचे आभार. कोरमचे संकट गोकुळच्या निवडणुकीवर आले होते. त्यांनी फेट नरेटीव्ह पसरवून आमच्या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
प्रशासका शिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. अस झालं असतं 13 लोकांना घर बसावे लागलं असतं. दूध उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. अतिशय पारदर्शक पद्धतीने कामकाज करेल. हा दूध संघ अमूल सोबत काम करणार नाही, तर अमूलपेक्षा चांगले काम करु. तज्ञ संचालक शासनाने नियुक्त केलेले उच्चशिक्षित आणि अनुभवी आहेत. अध्यादेश आहे त्याचे पुढे कायद्यात रुपांतर होईल असं हसन मुश्रीम म्हणाले.