• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /महाराष्ट्रातील 45 दूध संघांचा मोठा निर्णय; गाय आणि म्हशीच्या दुधात 4 रुपयांची दरवाढ

महाराष्ट्रातील 45 दूध संघांचा मोठा निर्णय; गाय आणि म्हशीच्या दुधात 4 रुपयांची दरवाढ

महाराष्ट्रातील 45 दूध संघाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. गाय आणि म्हशीच्या दुधात 4 रुपयांची दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 13, 2026, 22:30 IST|Updated: Nov 13, 2026, 22:31 IST
joinshare
महाराष्ट्रातील 45 दूध संघांचा मोठा निर्णय; गाय आणि म्हशीच्या दुधात 4 रुपयांची दरवाढ

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र दूध दरवाढ : अमूल, मदर डेअरीनंतर महाराष्ट्रातील विविध दूध संघांनी देखील दुधाच्या दरामध्ये वाढ केली आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर चार रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यातील कात्रज दूध संघ आणि व्यावसायिकांमध्ये बैठक पार पडली, या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

गायीच्या दुधात 4 रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधात 4 रुपये प्रति लिटर अशी दरवाढ करण्याचा पुणे जिल्हा दूध व्यावसायिक कल्याणकारी  संघटनेने घेतला आहे.  आज पुण्यातील कात्रज दूध संघात सहकारी आणि खासगी प्रमुख दुग्ध व्यावसायिक आणि डेअरी उद्योजक यांची बैठक पार पडली. यात सर्वानुमते 4 रुपये प्रति लिटर एवढी दरवाढ करण्यात आली आहे. येत्या 16 नोव्हेंबर 2026 पासून हे नवीन दर लागू करण्यात येईल. पूर्वीच्या किमतीवर अधिक 4 रुपये प्रति लिटर अशी किंमत आता ग्राहकांना मोजावी लागणार आहे. 

अमूलनंतर आता गोकुळचं दूध महागणार? 

अमूलने दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ केल्यानंतर आता गोकुळनेही त्यांच्या दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या गोकुळची नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत प्राधान्याने चर्चा होणार आहे. सध्या दुधाचा तुटवडा सुरू असून दूध उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमूलने 2 ते 4 रुपयांपर्यंत विक्री दर वाढवले आहेत. गोकुळनेही याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

सध्या गोकुळची 14 लाख लिटरपर्यंत दैनंदिन विक्री आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ दुधाची सर्वाधिक विक्री होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुधाचे उत्पादन कमी झालं आहे. त्या तुलनेत पशुखाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघानेही विक्री दरात वाढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या गोकुळचे दूध हे मुंबईत प्रतिलिटर 78 रुपयांनी विक्री होते.. दुधाचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दर वाढवून देण्याची शक्यता आहे.

11 नोव्हेंबरपासून अमूल आणि मदर डेअरीदरवाढ लागू

11 नोव्हेंबर रोजी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किरकोळ विक्री दरात वाढ केली आहे. अमूलचं दूध 2 ते 3 रुपयांनी महागलं असून मदर डेअरीनंही दूध दरात प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची वाढ केली आहे.  गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी दरवाढीची घोषणा केली. अमुलच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या 'अमूल ताजा' टोन्ड दुधाच्या प्रतिलिटर दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 'अमूल गोल्ड' दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.. दूध खरेदी खर्च वाढल्यानं ही दरवाढ केल्याचं सांगण्यात आले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News