• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /बंटी पाटील यांना पहिला मोठा धक्का! गोकुळचा नवा अध्यक्ष कोण? येत्या 24 तासांत ठरणार, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

बंटी पाटील यांना पहिला मोठा धक्का! गोकुळचा नवा अध्यक्ष कोण? येत्या 24 तासांत ठरणार, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

बंटी पाटील यांना पहिला मोठा झटका देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे. अध्यक्षही निवडला जाणार आहे. निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 09, 2026, 19:17 IST|Updated: Nov 09, 2026, 19:22 IST
joinshare
बंटी पाटील यांना पहिला मोठा धक्का!  गोकुळचा नवा अध्यक्ष कोण? येत्या 24 तासांत ठरणार, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गोकुळ निवडणूक : सतेज पाटील उर्फ बंटी पाटील पहिला मोठा झटका देणारी घडामोड घडली आहे.  गोकुळची निवडणूक ठरल्याप्रमाणे पार पडणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. अध्यक्षही निवडला जाणार आहे. 25 निवडून आलेल्या सदस्यांसह शासननियुक्त 4 सदस्यही मतदान करणार आहेत. मात्र त्यांची मतं स्वतंत्र ठेवली जाणार आहेत. संपूर्ण प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे. निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

शासन नियुक्त संचालकांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा अध्यादेश असंवैधानिक आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेल्या मतदान अधिकाराचा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यांना पत्र लिहिलंय. गोकुळच्या अध्यक्षाची निवड निवडून आलेल्या 25 संचालकांच्या बहुमताने व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. मात्र, त्यांची मागणी फेटाळली आहे. 

10 नोव्हेंबर  2026 रोजी ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार

10 नोव्हेंबर  2026 रोजी ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार आहे.  निवडून आलेल्या २५ सदस्यासोबत शासनाने नियुक्त केलेले चारही सदस्य मतदान करणार आहेत.  शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांची मतदान केलेली मते वेगळे ठेवले जाणार आहेत.  सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाणार आहे.  निकालही जाहीर केले जाणार आहे. तसेच  अध्यक्षही निवडला जाणार आहे. 

राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली

राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळण्यात आली आहे.  अध्यादेश बरोबर की चूक हे अद्याप ठरले नाही. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन असून  निवडणूक अधिकारी कायद्याच्या चौकटीत निवडणूक घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान,  कोल्हापूर जिल्हा बँकेत गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू झाल्या आहेत.  मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश अबिटकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडीक याच्यासह महायुतीच्या नेते बैठकीला हजर.   औरंगाबाद खंडपीठाने उद्याच अध्यक्ष्य पदाची निवड करावी असा आदेश दिल्याने महायुती मधे जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.  गोकुळचा अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार यावर महायुतीच्या बैठकीत खलबतं सुरु आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Maharashtra Politics
Political News