SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'आव्हान द्यायचं असेल तर तुमचं कर्तृत्व...', 'तुम्हाला उद्ध्वस्त करु' धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचं उत्तर, म्हणाले 'मी खपवून...'

सरकारी पदाचा, यंत्रणेचा वापर करुन धमक्या देणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही अशा शब्दांत सतेज पाटील यांनी इशारा दिला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 12, 2026, 18:07 IST | Updated: Nov 12, 2026, 18:31 IST
Image Credit: उद्ध्वस्त करु' धमकी देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना सतेज पाटलांचं उत्तर
Join

सरकारी पदाचा, यंत्रणेचा वापर करुन धमक्या देणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही.  मी खपवून घेण्याचा तर संबंधच नाही अशा शब्दांत सतेज पाटलांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्धवस्त होईल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना दिला होता. मी तर त्यांना आव्हान दिलं आहे की, अशा धमक्या देण्यापेक्षा निवडणुकीच्या रिंगणात उतरा. लोकसभा, विधानसभा जिथे राहायचं तिथून उभं राहावं असंही ते म्हणाले आहेत. 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, "आपण आव्हान देतो तेव्हा ते आपल्या कर्तृत्वावर असलं पाहिजे. सरकारी पदाचा वापर करुन आव्हान देणं याला आव्हान म्हणत नाही. त्यांनी स्वर्गीय डी वाय पाटील यांच्याबाबात असं विधान कऱणं अपेक्षित नव्हतं. यामागील कारण त्यांनी सांगितलं पाहिजे. उद्ध्वस्त करतो ही कोणती भाषा आहे. ही महाराष्ट्राची भाषा आहे का?". चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टार्गेट करत संपत्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले. डी वाय पाटील स्कुटरवरून फिरत होते, आता त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी कुठून आली हे जाहीर करा असं आव्हान दिलं होतं.

"एखादी सभा असते तेव्हा वेगवेगळे वक्ते बोलत असतात. मी, जयंत पाटील, राजू शेट्टी यांनी कुठेही चुकीचा उच्चार केला नाही. हसन मुश्रीफ यांनी तर त्याच रोडवर ऊसाला दर दिला म्हणून त्यांचे पोस्टर लावले होते. कारण नसताना वाद नको म्हणून पोलिसांनीच ते उतरवले. आमच्याकडून कोणताही अनुद्गार काढण्यात आला नव्हता. पण त्यांची भाषा चुकीची आहे हे त्यांना कळलं म्हणून दोन पावलं मागे घेतली असावीत," असं त्यांनी म्हटलं.

हे ही वाचा - 'तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करु' इशारा देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, 'जे स्वतः मर्द नसतात...'

"सोशल मीडिया कोणाच्यात हातात नाही. भाजपाकडून जातीवाद करण्यात आला. हसन मुश्रीफ बोलू शकत नाहीत. प्रकाश बिलवडे त्यांच्याबद्दल सहा महिन्यापूर्वी किती बोलले होते. भाजपाच्या युट्यूबवर काय बोललं गेलं त्यावर बोलण्याचं त्यांच्याकडून धाडस नाही. त्यामुळे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे, हे दुर्देवी आहे. 15-20 वर्षं एकत्र काम केलं असताना असे आरोप करणं म्हणजे मला त्यांनी ओळखलं नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

"त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. साडे चार हजार मतं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आमच्या प्रथम निवडून आलेल्या उमेदवाराला 3400 मतं पडली आहेत. अडीच हजारांच्या वर सर्वांना मतं पडली. मग ही मतं पाहता रोष किती होता...लोकांची इच्छा पॅनेलचं नेतृत्व आमच्याकडे राहावं असं होतं आणि त्याचा परिमाण मतदानातून दिसला," असं त्यांनी सांगितलं.

"लोकांनाही बंटी पाटील, मतांचा अपमान झाल्याचं आवडलं नाही. आमच्या मताची उद्या किंमतच सरकार करणार नसेल तर अर्थ काय म्हणून लोक लोखांच्या संख्येने रस्त्यावर उतरले. अनधिकृतपणे निवड झाली तेव्हा निरुत्साह होता. फक्त दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी झाल्या. पण आमचा संघर्ष मोर्चा कायमपणे महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या स्मरणात राहील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES