• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करु' इशारा देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, 'जे स्वतः मर्द नसतात...'

'तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करु' इशारा देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, 'जे स्वतः मर्द नसतात...'

हातात सत्ता असल्यावर कुत्र्याला वाटत की मी वाघ आहे, हे तर वळू आहेत अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 11:19 IST|Updated: Nov 11, 2026, 11:23 IST
joinshare
'तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करु' इशारा देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, 'जे स्वतः मर्द नसतात...'
Image Credit: चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी दिलं उत्तर

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात बाजी मारल्यानंर महायुतीच्या नेत्यांनी विजयी जल्लोष केला. विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच काही नेत्यांनी उमेदवार राजेश पाटील यांचा विजय जाहीर करत जल्लोष सुरु केला होता. महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना 16 मतं मिळाली, तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना 13 मतांवर समाधान मानावं लागलं. शासननियुक्त संचालकांच्या मतदानामुळे निकालाचं पारडं महायुतीच्या बाजूने झुकलं. दरम्यान गोकुळमध्ये विजयी होण्याआधी आणि झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी थेट सतेज पाटील यांना लक्ष्य केलं. यावेळी चंद्रकांत पाटलांनी तर फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्धवस्त होईल असा इशाराच दिला. त्यांच्या या इशाऱ्याला शिवसेना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

गोकुळ विरोधकांच्या ताब्यात गेलं असतं, तर सहा महिन्यांत त्याचं नाव डी. वाय. पाटील दूध संघ झालं असतं, असा टोला महाडिक यांनी लगावला.तर दुसरीकडे  खासदार धनंजय महाडिकांनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सतेज पाटलांना टार्गेट केलं सतेज पाटलांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी थेट सवाल उपस्थित केले. डी वाय पाटील स्कुटरवरून फिरत होते, आता त्यांच्याकडे इतकी प्रॉपर्टी कुठून आली हे जाहीर करा असे आव्हान दिलं.

'जे स्वतः मर्द नसतात त्यांना दुसऱ्याच्या कर्तबगारीचा द्वेष'

चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर राऊत म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांच्यासारखे विध्वंसक लोक, जे स्वतः मर्द नसतात त्यांना दुसऱ्याच्या कर्तबगारीचा द्वेष वाटतो. कारण ते स्वत: कर्तबगार नसतात. डी वाय पाटील हे कोल्हापुरात स्कुटरवरुन फिरत होते, त्याचा आणि गोकुळ दूध संघाचा काय संबंध? स्कुटरवरुन फिरणाऱ्या एका व्यक्तीने स्वत:ची हिंमत, कर्तृत्व आणि अक्कल हुशारीवर जगभरात एक शैक्षणिक साम्राज्य उभं केलं याचं मराठी माणसाला कौतुक आहे. चंद्रकांत पाटलांना ते नसावं. त्यांना मोदी आणि शाहांचं कौतुक असेल आम्हाला डी वाय पाटलांच आहे".

हे ही वाचा - 'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'

'मोदी चहा विकत होते तर मग आता वैभव कसं उभं राहिलं'

पुढे ते म्हणाले की, "मोदी चहा विकत होते तर मग आता वैभव कसं उभं राहिलं. अदानीही स्कुटरवरुन फिरत होते. चंद्रकात पाटलांना माहिती नाही का? त्यांना विचारता येत नसेल तर मी त्यांची आणि अदानींची भेट घडवून आणतो. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गुजरातचा होऊ शकतो तर मग डी वाय पाटील स्कुटवरुन फिरत असताना इतकं साम्राज्य उभं कसं केलं असा प्रश्न का पडतो. प्रत्येक मराठी माणसाने अशा प्रकारचं साम्राज्य उभं करावं या मताचे बाळासाहेब सुद्धा होते. तुम्ही जे पैसे देऊन कोथरुडला मत खरेदी केले ते पैसे कुठून आले? कोणत्या खात्यातून आले?".

'हातात सत्ता असल्यावर कुत्र्यालाही वाटतं की मी वाघ'

अशा प्रकारची भाषा मंत्र्यांनी करावी हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याला आवर घातला पाहिजे. कोणी खून करत सुटलं आहे. कोणी खुन्यांना समर्थन देत आहे, कोणी लोकशाही विकत घेत आहे. कोणाला आव्हाने देत आहेत. उद्ध्वस्त करेन ही अशी भाषा मंत्री करतोय. हातात सत्ता असल्यावर कुत्र्यालाही वाटतं की मी वाघ आहे, हे तर वळू आहेत. पण ते वाघ नसतात अशीही टीका त्यांनी केली.

'इतिहासात असा काळा दिवस नाही'

"काल गोकुळची निवडणूक पार पडली नाही. काल जे घडले त्याला निवडणूक म्हणत नाही. निवडणूक 25 सदस्यांमध्येच व्हायला पाहिजे. 13 चे बहुमत असलेले पॅनल शेतकऱ्यांनी निवडून दिले. पण फडणवीस यांनी  शाह यांच्या दबावाखाली 4 संचालक नेमले. कोल्हापुरातले 2 वळू मंत्री त्यांनी जे तांडव केले त्याचा परिणाम दिसला. त्याला लादणे आणि ओरबाडणे म्हणतात. लोकशाहीच्या दृष्टीने हानीकरण घडले आणि याचा परिणाम दिसेल. लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम केले. राज्यातील मंत्र्याना हे करणे शोभत नाही. ईडीला जे घाबरून पळून गेले ते शड्डू ठोकताला पाहिले. हे दिवस बदलतील तेव्हा पळून जाऊ नका. इतिहासात असा काळा दिवस नाही," अशी टीकाही त्यांनी केली. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
Chandrakant Patil
Satej Patil
Devendra Fadnavis