• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'

'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'

गोकुळच्या अध्यक्षपदावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असतानाच आज मतदानाच्या दिवशी निकालाच्या आधीच महायुतीने जाहीर सभा घेत आपला अध्यक्ष निवडून येईल असं जाहीर करत सतेज पाटलांवर निशाणा साधला आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 13:54 IST|Updated: Nov 10, 2026, 14:09 IST
joinshare
'फडणवीसांनी डोळे वटारले तर...', सतेज पाटलांना चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरातून इशारा; थेट प्रॉपर्टीच काढली, 'वैचारिक उंची पाहून...'
Image Credit: गोकुळचा निकाल लागण्याआधीच चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर सहकारी दूध संस्था म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडत असून संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील समविचार आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्यानंतर कोरम पूर्ण न झाल्याने अध्यक्ष निवड रखडली. यानंतर सरकारने चार सदस्यांची संचालक म्हणून नेमणूक केली. याला सतेज पाटलांनी कोर्टात आव्हान दिलं आहे. मात्र आजच्या निवडणुकीच्या निकालाआधीच कोल्हापुरमध्ये महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सतेज पाटलांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील एकटेच

"मला याची जाणीव आहे आपण तळपत्या उन्हात उभे आहात. जनता उन्हात आहे तर नेते देखील उन्हात उभे राहायचं असतं. गेल्या पंधरा दिवसापासून ज्या शिव्या शाप झाले ज्या पद्धतीने घोषणा दिल्या गेल्या त्या एका विजयाने संपणार आहे," असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. "सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम करण्याचा माहितीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. निदान महायुतीमध्ये सगळे मित्र एकत्र आहेत. पण महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील एकटेच आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे दिसली नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कुठे दिसला नाही. सगळ्यांना पायाखाली घ्यायचं आणि आपली टिमकी वाजवायची," असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी समविचार आघाडीवर निशाणा साधला.

फडणवीसांनी डोळे वटारले तर...

"सतेज पाटील अजूनही बंटीच आहेत. ते कधीच साहेब झाले नाहीत. तुम्हाला 13 जागा मिळाल्या असल्या तरी आम्हाला 4 हजार 900 मतं मिळाली. गोकुळच्या हितासाठीच मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढला. डी. व्हाय. पाटील स्कूटरवरुन फिरायचे. आता तुमची संपत्ती किती?" असा सवाल चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांना केला.  हम किसी को टोकेंगे नाही. टोका तो छोडेंगे नही. वैचारिक उंची पाहून बोला. काचेच्या घरात राहण्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नये. सतेज पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न! महायुतीचे संचालक शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतील. फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य उद्धवस्त होईल," असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला.

आम्ही शब्द देतो कोल्हापूरमध्ये 'अमूल'ला...

आमदार विनय कोरेंनी आपल्या भाषणामध्ये, "रस्त्यावरची लढाई कोणी लढत असेल तर त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आपला चेअरमन आपण करतोय. आम्ही सगळे एकत्र यायला पाहिजे होतं, परमेश्वर कोणाच्या बाजूने हे जिवंत उदाहरण आहे. तुमचा एक संचालक जादा आला म्हणून
तुम्हाला चेअरमन कराण्यासाठी निवडून दिलेले नाही. महाराष्ट्र सरकारला तुम्ही चॅलेंज करता पण तुम्ही खरंच बहुमतावर आला का याचा विचार करायला पाहिजे. अमूल दूध संघ नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही शब्द देतो कोल्हापूरमध्ये 'अमूल' दूध संघाला येऊ देणार नाही," असं म्हटलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Chandrakant Patil
Satej Patil