SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'दादा, तुझ्याशिवायची ही पहिली भाऊबीज, आजच्या दिवशी तुझं नसणं...', सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने झाल्या भावूक

अजित पवारांच्या निधनानंतरही ही पहिलीच दिवाळी असून कालच दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीकरांनी लाडक्या अजित पवारांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आज सुप्रिया सुळेंनी लाडक्या भावासाठी भावनिक पोस्ट केली आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 08:38 IST | Updated: Nov 11, 2026, 08:56 IST
Image Credit: सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Join

भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचे दिवंगत बंधू अजित पवारांच्या आठवणींमध्ये एक भावूक पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना सुप्रिया सुळेंनी दरवर्षी बारामतीमध्ये साजऱ्या होणाऱ्या भाऊबीजेचे मागील वर्षाचे काही खास क्षण असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच दिवाळी असून सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टमधून अजित पवारांच्या सर्व बहि‍णींच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली," असं सुप्रिया सुळेंनी पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे. सोबत जोडलेल्या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे अजित पवारांचं औक्षण करताना दिसत आहेत.

जुन्या आठवणींना उजाळा देताना, "आपलं एकत्र येणं, गप्पा, हसणं… आम्हा बहिणींच्या घोळक्यात हरखून गेलेला तू आजही डोळ्यांसमोर उभा राहतोस. तेव्हा अगदी सहज वाटणारे ते क्षण आज किती मोलाचे वाटतात," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

पोस्टच्या शेवटी सुप्रिया सुळेंनी, "दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं मनाला चटका लावून जातं. आम्हा सगळ्या बहिणींना तुझी किती आठवण येतेय, हे शब्दांत सांगणंही कठीण आहे. तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील," असं म्हणत लाकड्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

बारामतीकराकडून अनोखं अभिवादन

बारामतीमध्ये दरवर्षी अजित पवार दिवाळी पाडव्याला बारामतीकरांची भेट घ्यायचे. मात्र दादांशिवायच्या यंदाच्या पहिल्याच दिवाळीमध्ये बारामतीकरही भावूक झाल्याचं दिसून आलं. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीकरांनी बारामती येथील सनसेट पॉईंट 10 हजारांहून अधिक पणत्या प्रज्वलित करून दादांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी अजित पवारांच्या पत्नी तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहकुटुंब उपस्थित होत्या. 

"प्रत्येक पणतीच्या प्रकाशात दादांविषयीचे प्रेम, आदर आणि त्यांच्या असंख्य जिवंत आठवणी अनुभवायला मिळाल्या. दादांसोबत साजरा केलेला दिवाळी पाडवा, त्यांचा सहवास, त्यांचं प्रेमळ बोलणं आणि कार्यकर्त्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं आज प्रकर्षानं आठवलं. दादा आज आपल्यात नसले, तरी बारामतीकरांच्या मनामनात ते आजही आहेत. त्यांच्या आठवणींचा हा दीपोत्सव त्यांच्या प्रेमाची आणि त्यांनी जोडलेल्या माणसांच्या नात्यांची साक्ष देणारा आहे. दादा, तुमच्या स्मृतींचा प्रकाश सदैव आमच्या मनात असाच तेवत राहील!" अशा शब्दांमध्ये सुनेत्रा पवारांनी या कार्यक्रमानंतर फोटो पोस्ट करताना इन्स्टाग्रामवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली.

अजित पवार यांचे 29 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झालं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES