SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ना सतेज पाटील, ना मुश्रीफ... आज हे चौघे फिरवणार 'गोकुळ'चा निकाल? शासन नियुक्त 4 सदस्यांची नावं समोर, पण...

मागील काही आठवड्यांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या गोकूळमध्ये आज अखेर अध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार असलं तरी निर्णयाक चार मतं कोणाकडे आहेत? शासन नियुक्त सदस्य कोण हे जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 06:23 IST | Updated: Nov 10, 2026, 06:53 IST
Image Credit: शासनाने नियुक्त केलेल्या संचालक सदस्यांची नावं समोर (प्रातिनिधिक फोटो)
Join

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी आज मतदान पार पडणार आहे. संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असलेल्या गोकुळ निवडणुकीच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये नेमकी कोणाला आणि कशी मतं मिळणार याबद्दल सर्वांमध्येच संभ्रम आहेत. त्याच सरकारने निवडणुकीच्या एक दिवस आधी चार सदस्यांची नावं जाहीर केली आहे. 

प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हनस मुश्रीफ यांच्या हातात काहीही नसणार. नवनियुक्त चार सदस्यच या निवडणुकीचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार याचा निर्णय घेतील असं चित्र दिसत आहे. हे चार नवनियुक्त सदस्य कोण? आकडे काय सांगतात आणि न मिळालेल्या नोटीसचा संभ्रम काय हे सर्व जाणून घेऊयात...

'गोकुळ'च्या संचालक मंडळावर नियुक्ती झालेले चार सदस्य कोण?

1) शिवाजी दिनकर आडनाईक-
हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील यावलूज येथील रहिवाशी आहे.

2) डॉ. प्रवीणनंद रंगनाथ हेंद्रे -
कोल्हापूर जिल्ह्यातील हातगणंगले तालुक्यातील पेवडगाव येथील रहिवाशी असलेल्या प्रवीणनंद यांचीही संचालक मंडळावर नियुक्ती झाली आहे.

3) अॅड. प्रशांत भगवान पाटोळे -
सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथील विनायकनगरमध्ये प्रशांत पाटोळे राहतात.

4) कृष्णात ज्ञानदेव पाटील - 
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील केनवडे येथे कृष्णात यांचे वास्तव्य आहे.

कोणताची किती ताकद?

एकूण निवडून आलेले संचालक – 25
समविचारी आघाडी – 13
महायुती – 12
शासन नियुक्त संचालक - 4

कसा निवडला जाऊ शकतो अध्यक्ष?

निवड प्रक्रिया कशी होऊ शकेल यासंदर्भात दोन पर्याय असून पहिल्यामध्ये केवळ निवडून आलेल्या संचालकांना मतदान करण्याचा अधिकार दिला जाईल. त्यामुळे समविचारी आघाडीची 13 आणि महायुतीची 12 मतं असतील. असं झालं तर समविचारी आघाडीचा अध्यक्ष निवडून येईल. दुसऱ्या पर्यायामध्ये शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिला तर गणित पूर्णपणे बदलू शकते. महायुतीचे 12 सदस्य आणि शासन नियुक्त चार संचालक अशी 16 मतं ग्राह्य धरली तर समविचारी आघाडीची 13 मतं यासमोर कमी पडतील आणि महायुतीचा अध्यक्ष निवडून येईल.  

नोटीस अन् संभ्रम

सहकार कायद्यानुसार अध्यक्ष निवडीसाठी संचालकांना किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देणे बंधनकारक असते. अगदीच विशेष परिस्थितीमध्ये किमान 3 दिवसांची नोटीस देण्याची तरतूद सहकार कायद्यात आहे. मात्र, शासन नियुक्त चार संचालकांची घोषणात निवडणुकीच्या एक दिवस आधी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्रत्यक्ष निवडणुकीच्या एक दिवस आधीच नियुक्ती झाल्याने या नवनियुक्त संचालकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे आजच्या अध्यक्ष निवडीत या चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळणार की केवळ निवडून आलेल्या 25 संचालकांनाच मतदान करता येणार, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र या चार सदस्यांची मतं निवडणुकीचा निकाल फिरवू शकतात. 

पुन्हा न्यायालयीन लढाई?

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठरल्याप्रमाणे अध्यक्ष निवड प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले असले तरी शासन नियुक्त सदस्यांची मतं वेगळी ठेवण्यास न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे निकालावरुन पुन्हा न्यायालयीन लढाईची शक्यता नाकारता येत नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES