SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मोर्चात कोल्हापूरचे स्थानिक नव्हते', मुश्रीफांचा हल्लाबोल; 'आमचाच अध्यक्ष होणार' म्हणत निशाणा, 'निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटलांनी उन्माद...'

आज गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मतदान पार पडत असून या मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीमधील नेत्यांनी समविचारी आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटलांवर निशाणा साधला.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 10, 2026, 07:28 IST | Updated: Nov 10, 2026, 07:43 IST
Image Credit: मतदानाच्या आदल्या दिवशीच सतेज पाटलांना केलं लक्ष्य (प्रातिनिधिक फोटो)
Join

कोल्हापूर दूध महासंघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडत असून समविचारी आघाडी की महायुती कोणाचा अध्यक्ष बसणार याबद्दल उत्सुकता आहे. असं असताना या मतदानाच्या पूर्वसंध्येला खासदार धनंजय महाडीक, मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. हसन मुश्रीफ यांनी महायुतीचाच अध्यक्ष बसेल असा विश्वास व्यक्त करतानाच काँग्रसचे आमदार सतेज पाटलांवर निशाणा साधला. 

गोकुळ दूध संघ हा डी. व्हाय. पाटील दूध संघ होणार नाही याचा आनंद

धनंजय महाडीक यांनी, "डेड लॉक स्थिती निर्माण झाली होती. पन्नास पन्नास टक्के मतदान झाले. तरी देखील आम्ही कोर्ट आणि रस्त्यावरील लढाई करणार अशी भूमिका घेतली गेली," असं म्हणत थेट सतेज पाटलांचा उल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला. "दोन वेळा आणखी सभा झाली असती तर प्रशासक लागला असता. अध्यक्ष्य निवड 25 लोक निवड करतील. असे असताना कांगावा करण्यात आला. अनेक सहकारातील नेते आज मोर्चात आले होते, पण कोरम नसेल तर सभा होऊ शकत नाही हे त्यांना माहिती असताना त्यांनी दिशाभूल केली. गोकुळ दूध संघ हा डी. व्हाय. पाटील दूध संघ होणार नाही याबद्दल आनंद आहे," असा टोला महाडीक यांनी लगावला. 

नक्की वाचा>>
ना सतेज पाटील, ना मुश्रीफ... आज हे चौघे फिरवणार 'गोकुळ'चा निकाल? शासन नियुक्त 4 सदस्यांची नावं समोर, पण...

विरोधात लढतो तर तुम्ही म्हणाल तसे कसं वागू?

पालकमंत्री प्रकाश अबिटकरांनी, "लोकांचा बुध्दी भेद करण्यात आला. गोकुळच्या बायलॉजमध्ये जो नियम आहे, तो इतर कोणत्याच बायलॉजमध्ये नाही. आम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेतला असता तर हे घडले नसते. आम्ही तुमच्या विरोधात लढलो आहे, त्यामुळे तुमच्या सोबत आणि तुम्ही म्हणाल असे आम्ही कसे वागू?" असा सवाल केला. तसेच, "उद्याच्या निवडीत महायुतीचा चेअरमन होणार," असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. 

हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांवर सडकून टीका

'गोकुळ' दूध संघाचा अध्यक्षपदाचा पेच सुटला असून हे अध्यक्षपद महायुतीकडेच जाणार, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या निवडीच्या राजकारणावरून त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले. "स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी सतेज पाटील यांनी काम केले आहे. आजच्या मोर्चाला राज्यभरातील लोक आलीत, स्थानिक लोक नव्हते. हर्षवर्धन संकपाळ यांना हटवून स्वतः प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे," अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली. 

तसेच, निवडणूक जिंकल्यानंतर सतेज पाटलांनी उन्माद केला, त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा किंवा सत्ता वाटून घेण्याबाबत कोणतीही चर्चा केली नाही, असंही हसन मुश्रीफ म्हणाले. सतेज पाटलांकडे समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. केवळ त्यांच्या अध्यक्षपदासाठी आमच्या १२ संचालकांनी बैठकीला हजर राहावे, असा त्यांचा हेका होता, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES