• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी निघाले, वाटेतचं मृत्यूनं गाठलं

पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी निघाले, वाटेतचं मृत्यूनं गाठलं

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पुण्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 06:11 PM IST|Updated: Nov 15, 2026, 06:16 PM IST
joinshare
पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी निघाले, वाटेतचं मृत्यूनं गाठलं

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

बेळगाव  अपघात : सौंदत्ती यल्लम्माच्या दर्शनासाठी निघालेल्या पुण्याच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. भीषण अपघातात चिमुकल्यासह तिघेजण ठार झाले आहेत.  बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात हा अपघात झाला आहे. कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात  पुण्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मालदिन्नी क्रॉसजवळ कार आणि ट्रकची यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

ओंकार चंद्रशेखर मांडरे (वय २६), रेश्मा मांडरे (वय ३२) आणि देवांश मांडरे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. पुण्यातील मांडरे कुटुंब सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी कारने जात होते. 

प्रवासादरम्यान यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि आतील तिघांनी जागीच प्राण सोडले.

या अपघातात श्रीकांत मांडरे, वंदना मांडरे आणि हर्षदा मांडरे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-न्हावरे रोडवर भीषण अपघात

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर-न्हावरे रोडवर भीषण अपघात झाला.. उरळगाव परिसरात एका खाजगी ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून, अपघातात ट्रक आणि बस चालक असे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ​खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये एकही प्रवासी नव्हता, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, दोन्ही चालकांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यात भीषण अपघात

लातूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तुळजापूरहून औसाकडे येत असताना टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात भीषण धडक झाली. पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दुचाकीवरील तायप्पा बंडगर आणि ओमकार बंडगर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Accident
Pune
Pune News