• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'गोकूळ'संदर्भात सतेज पाटील बोलले तेच होतंय! आज कोल्हापूरात फक्त मोर्चा नाही तर सकाळी 10.30 वाजता...

'गोकूळ'संदर्भात सतेज पाटील बोलले तेच होतंय! आज कोल्हापूरात फक्त मोर्चा नाही तर सकाळी 10.30 वाजता...

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवरील विजयासहीत बहुमत मिळाले होते, तर विरोधी महायुतीला 12 जागा जिंकल्यात.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 06:22 IST|Updated: Nov 09, 2026, 06:45 IST
joinshare
'गोकूळ'संदर्भात सतेज पाटील बोलले तेच होतंय! आज कोल्हापूरात फक्त मोर्चा नाही तर सकाळी 10.30 वाजता...
Image Credit: कोल्हापुरमध्ये दुहेरी संघर्ष पाहायला मिळणार (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा' काढण्यात येणार आहे. मात्र त्याचबरोबर रविवारी समविचारी आघाडी दाखल केलेल्या याचिकेमुळे या प्रकरणाची आज न्यायालयात देखील सुनावणी होणार असल्याने सतेज पाटलांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरची लढाई म्हणजेच मोर्चा आणि न्यायालयीन लढाई आजच होताना पाहायला मिळणार आहे.

न्यायालयीन लढाई

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजेच गोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक नेमून त्यांना मताचा अधिकारी देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून तो अध्यादेश रद्द करण्याबाबतची याचिका 'राजर्षी शाहू समविचारी आघाडी'ने रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली. या याचिकेवर आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.  गोकुळ अध्यक्ष निवडीची सभा मंगळवारी होणार आहे. या सभेपूर्वीच राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालक नेमून त्यांना मताचा अधिकार देण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. राज्यपालांनीही त्याचा वटहुकूम काढला आहे. मात्र, हा वटहुकूम बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी या याचिकेत केली आहे.

नेमकं घडलंय काय?

सतेज पाटलांनी हाक दिलेला हा मोर्चा सकाळी 10 वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून सुरू होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागांवरील विजयासहीत बहुमत मिळाले होते, तर विरोधी महायुतीला 12 जागा जिंकल्यात. मात्र, अध्यक्ष निवडीच्या दिवशी महायुतीचे सदस्य हजर न राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळ अध्यक्ष निवडीवरुन पेच निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करून 3000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या संस्थांमध्ये 4 शासननियुक्त (स्वीकृत) संचालक नेमण्याचा निर्णय घेतला. यामुळे महायुतीचे संख्याबळ वाढल्याची चर्चा आहे. असं झालं आणि या चार शासननियुक्त संचालकांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं तर सतेज पाटील यांच्या 'समविचारी आघाडी'च्या हातातील बहुमत निसटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सतेज पाटलांची टीका

सरकारने अध्यादेशाच्या आडून घेतलेला हा निर्णय म्हणजे 'सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा' असल्याची टीका सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना नोंदवतील. तसेच हा निर्णय म्हणजे कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. 'गोकुळ तुमची जहागीर नाही, अहंकाराची मस्ती कोल्हापूर उतरवतं' असा इशारा सरकारला देत आजच्या मोर्चाची हाक दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Satej Patil
Kolhapur