• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /कोल्हापूर हादरले! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांना विषबाधा, गर्भवती महिलेचा समावेश

कोल्हापूर हादरले! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांना विषबाधा, गर्भवती महिलेचा समावेश

कोल्हापुरात नऊ उसतोड कामगारांच्या मुलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येतेय. यात एक गर्भवती महिलेचाही समावेश आहे

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 08, 2026, 10:17 IST|Updated: Nov 08, 2026, 10:31 IST
joinshare
कोल्हापूर हादरले! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांना विषबाधा, गर्भवती महिलेचा समावेश
Image Credit: Kolhapur Food Poisoning

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. कोल्हापुरात ऊसतोड मजुरांच्या नऊ मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.  हातकणंगले तालुक्यातील अंबप मधील घटना असून एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ऊसतोडसाठी बीड जिल्ह्यातून ही मजुरांची टोळी आलेली. या टोळीतील एकूण दहा जणांना अचानक उलट्या, चक्कर आणि मळमळ सुरू झाली.. त्रास होऊ लागल्याने सर्वांना प्राथमिक उपचारासाठी अंबप इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील सी पी आर  रुग्णालयात हलविण्यात आले.

एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे. बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच संबंधितांना चक्कर येणे, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. ही बाब ऊसतोड मजुरांसह शेतमालक आशिष पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ सर्वांना अंबप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

सध्या सीपीआर रुग्णालयात 9 मुले आणि गर्भवती महिलेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या घटनेमुळं ऊसतोड मजुरांच्या वस्तीवर आणि परिसरात चिंताजनक वतावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर अशीच एक घटना घडली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील सम्राट अशोक नगर वसाहतीत अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रेंदाळ परिसरात आणि गावावर मोठी शोककळा पसरली आहे. वरद वैभव शिंगे (वय 4 वर्षे) आणि राही विनोद शिंगे (वय 2 वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शिंगे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Marathi Batmya
Religion News