• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! घरातून 35 तोळे सोने आणि चांदीचे दागिने जप्त

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! घरातून 35 तोळे सोने आणि चांदीचे दागिने जप्त

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणी पती अक्षय झांबरे आणि सासरे अरविंद आणि सासू मंगल यांना 9 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 11:53 IST|Updated: Nov 08, 2026, 11:57 IST
joinshare
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई! घरातून 35 तोळे सोने आणि चांदीचे दागिने जप्त
Image Credit: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पायल झांबरेच्या घरातून 35 तोळे सोनं आणि चांदीचे दागिने पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. पायलच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंडा आणि सोन्याच्या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान पायलचा मोबाईल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

दरम्यान पायलचा पती, सासू आणि सासर्‍यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसाची न्यायालयाकडून वाढ करण्यात आली आहे. पायलचा पती अक्षय झांबरे, सासरे अरविंद झांबरे, सासू मंगल झांबरे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. तिघेही 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहेत.

नेमकी घटना काय?

पुण्याच्या मुकुंदनगर परिसरातील अक्षय हाइट्स सोसायटीमधील जुन्या फ्लॅटमध्ये पायल अक्षय झांबरे या सॉफ्टवेअर अभियंता विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांनी सून असणाऱ्या पायलने गळफास घेत करत टोकाचं पाऊल उचललं होतं. पायलच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले होते. मुलगी झाली म्हणून छळ करण्यात आला, तसंच 50 तोळे सोने, जमीन अन् पैशांसाठी सासरच्यांनी जाच केल्याचा आरोप आहे. ‘माझ्या आत्महत्येला सासू जबाबदार’ असा भावाला तिने शेवटचा मेसेज केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2019 मध्ये पायलचं अक्षयळी लग्न झालं.  लग्नावेळी माहेरच्यांनी लाखोंमध्ये खर्च केला होता. 50 तोळे सोने, 25 लाख रुपये रोख आणि लग्नासाठी सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचा खर्च झाला होता. लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी तगादा लावला होता. यावेळी पैशांसह सोन्याची मागणी केली जात होती. मुलगी झाल्यानतंर हा छळ आणखीनच वाढला होता. यानंतर पायल काही काळ माहेरी होती. नंतर मध्यस्थी करत तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आलं होतं. पण त्यानंतरही तिचा छळ सुरु होता. याच छळातून अखेर तिने आत्महत्या केली.

एकनाथ शिंदेकडून कारवाईचं आश्वासन

पायल झांबरे यांच्या परिवाराला एकनाथ शिंदे यांनी फोन करत हे प्रकरण आम्ही फास्ट्रॅक वर चालवणार असं आश्वासन दिलं आहे. पुन्हा असे कोणी वागणार नाही, धाक दाखवण्याचं काम करू असं ते म्हणाले. कोणालाही आम्ही सोडणार नाही या प्रकरणात मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो असंही आश्वासन त्यांनी दिलं.


9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात अक्षय झांबरे आणि सासरे अरविंद आणि सासू मंगल यांना 9 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
crime