• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /....तर मी पाय धरायलाही तयार आहे, राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना दिला शब्द; आवाहन करत म्हणाले 'फक्त भलते गैरसमज...'

....तर मी पाय धरायलाही तयार आहे, राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना दिला शब्द; आवाहन करत म्हणाले 'फक्त भलते गैरसमज...'

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांत्या भेटीसाठी पोहोचले होते.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 05, 2026, 09:14 PM IST|Updated: Oct 05, 2026, 09:16 PM IST
joinshare
....तर मी पाय धरायलाही तयार आहे, राज ठाकरेंनी MPSC विद्यार्थ्यांना दिला शब्द; आवाहन करत म्हणाले 'फक्त भलते गैरसमज...'

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांत्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी 70 हजार पदांची भरती होणं शक्य नाही असं सांगताना पुन्हा एकदा भूमिपूत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. मराठी तरुण, तरुणींना नोकऱ्या मिळाल्या तर आंदोलनाची गरज नाही असं ते म्हणाले. तसंच मराठी मुलांसाठी जर कोणाचेही पाय घरायला लागले तर राज ठाकरे तयार आहे असंही सांगून टाकलं. आपण आऱक्षण पाहिजे म्हणतो. पण नोकऱ्या कुठे आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली.

सगळं खासगी होत चाललं आहे

आपण आऱक्षण पाहिजे म्हणतो. पण नोकऱ्या कुठे आहेत. सगळं खासगी होत चाललं आहे. केंद्र सरकार त्यासाठी बसलं आहे. जमीन, पोर्ट, विमानतळ अदानीला देत आहेत. खासी क्षेत्रात आरक्षण नाही. मग हे सगळं सरकारी धोरणांमुळे होत आहे. तुम्हाला गृहित धरलं आहे. याचं कारण निवडणुका येतात त्यावेळी पैसे फेकले जातात. त्याच्यातून निवडून येणार हे त्यांनी माहिती असतं. त्यांचा गैरसमज दूर करत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं.

पाय धरायला लागले तर राज ठाकरे तयार

शक्य त्या मार्गाने प्रश्न सोडवला पाहिजे. मराठी मुलांसाठी जर कोणाचेही पाय धरायला लागले तर राज ठाकरे तयार आहे. फक्त भलत्या गरैरसमज, प्रश्नात राहू नका. परस्थिती समजून घ्या आणि मगच आंदोलन सुरु ठेवा. रोज कोणीतरी येईल, भाषणं करतील, नवीन उमेद, स्वप्नं दाखवलीत पण वस्तुस्थिती समजून घ्या. बाबव वाढला पाहिजे, तो सरकारला कळता पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे. लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे असं ते म्हणाले आहेत.

तुमची वेदना मी समजू शकतो

"सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ कसा जातो, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही, हे आता देशभर जे आंदोलन सुरु आहे. तुमच्याकडे पेपर आणि आमच्याकडे मतं फुटत आहेत. या गोष्टींमुळे एक वर्ष पुढे जातं. जशी तुमच्या आयुष्यातील वर्ष  जातात तशी आमचीही जातात. जे आम्हाला वाटतं ते तुम्हाला कळू शकेल. संपूर्ण देशभर बेधुंदशाही सुरु आहे. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. एकाच बाजूने मन की बात सुरु आहे. जणू काही दुसऱ्या बाजूला मन नाही. रोज कोणीतर येणार, भाषण करणार, टाळ्या पिटणार यात आयुष्य घालवू नका. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. या आयुष्यातील एक एक वर्ष पुडे जात आहे. आम्ही निवडणुकांसाठी तयारी करतो, मग कळतं की, मतांची चोरी झाली. पाच पाच वर्ष निघून जातात. तुमची वेदना मी समजू शकतो," असंही त्यांनी सांगितलं.

जातीपातीच्या भानगडीत पडू नका

"देशात, महाराष्ट्रात प्रत्यक्ष स्थिती काय आहे जाणून घ्या. जातीपातीच्या भानगडीत पडू नका. यात तुम्हाला अडकवलं जात आहे. जेणेकरुन रोजच्या विषयाकडे लक्ष जाऊ नये. जातीत एकमेकांचा राग करा, मारा यात तुमचा वेळ गेला तर घरी जाऊन आई-वडिलांना काय तोंड दाखवणार आहात? अनेक मुलं कर्ज घेऊन आली आहेत. मराठा, धनगर, हिंदू, मुस्लिम यातच आपण अडकलो आहोत. कारण प्रश्नांकडे लक्ष जाऊ नये यासाठी भरटकवंल जात आहे, त्यातून बाहेर पडा", असं आवाहन त्यांनी केलं.

....तर आंदोलनाची गरज नाही

"मराठवाड्यासह महाराष्ट्रातून इतकी मुलं आली आहेत. पण नशिबात पेपर फुटला येत आहे. मी सांगतो ते सत्य आणि कडवट असतं. अनेकांना ते झेपत नाही. पण कालांतराने बरोबर बोलला असं कळतं. मी सांगतो की, 70 हजारांची पदभरती होणार नाही. हे तुम्ही आताच लक्षात ठेवा. दुसरं सरकार आलं तरी मागणी पूर्ण होऊ सकत नाही. परिस्थिती, वस्तुस्थिती समजून घ्या. पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. मी 20-22 वर्ष सतत सांगतोय की. नोकऱ्या कामधंदे मराठी मुला मुलींना मिळाले पाहिजेत. उद्या या गोष्टी मिळाल्या तर आंदोलनाची गरज नाही," असं ते म्हणाले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Pune
MPSC