SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'बघूयात रायगडाला जाग आली तर...', मुख्यमंत्री फडणवीसांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान, 'ही पण एक दंतकथाच...'

इतिहासातल्या दंतकथा रंजक असतात त्यामुळे त्या आवडतात पण आपण खरा इतिहास पण समजून घेतला पाहिजे असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 09, 2026, 13:01 IST | Updated: Nov 09, 2026, 13:09 IST
Image Credit: इतिहासावर कोणीही दावा करु नये, राज ठाकरेंचं विधान
Join

मुख्यमंत्री माझं ऐकतात असं नुकतंच एका भाजपा नेत्याने सांगितलं. मात्र ही पण एक दंतकथाच आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. पुण्यात  'समरभूमी पन्हाळगड' किल्ल्याच्या प्रतिकृतीचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी इतिहासावर बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. इतिहासातल्या दंत्तकथा रंजक असतात त्यामुळे त्या आवडतात पण आपण खरा इतिहास पण समजून घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.

इतिहासावर कोणीही दावा करु नये. कधी कोणती कागदपत्रं मिळतील आणि इतिहास बदलेल हे सांगता येत नाही असं ते म्हणाले. रायगडावर मुक्कामाची परवानगी नाही ही खंत इथं व्यक्त झाली. ती रास्तच आहे पण राञीच्या अंधारात उगीच टकमक टोकावरून ढकलून द्यायचे, म्हणून परवानगी नसावी असं त्यांनी मिश्किलपणे म्हणाले. तसंच अलीकडे कोणीही उठतो आणि गडावर जाऊन गाईड बनतो. त्यामुळे सरकारने या गाईड लोकांना आता गायडन्स देण्याची गरज आहे असा टोला त्यांनी लगावला.

परदेशात सरकार आणि तज्ज्ञ गाईडची नेमणूक करतात. हा माणूस योग्य आहे की नाही हे ठरवतात. कोणीही उठायचं आणि आता मला इतिहा सांगता येतो म्हणून गाईड व्हायचं असं कुठेही नसतं. मग चुकीचा इतिहास आपल्याकडे सांगितला जातो, अनेक दंतकथा पसरवल्या जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी एक रंजक दंतकथा सांगितली आणि म्हणाले, "इतिहासातल्या दंतकथा रंजक असतात त्यामुळे त्या प्रचलित असतात. पण आपण खरा इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासाकडून काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. नुसतं सणावळ्या पाठ करुन काय मिळणार आहे. इतिहासाकडे पाहणे म्हणजे पुतळे उभं करणं नव्हे. आपल्याकडे त्याचं फार वेड आहे. आपला प्रामाणिकपणा, इतिहास-महाराजांवरील प्रेम दाखवण्यासाठी पुतळ्यांवर पुतळे उभे करतात. महाराज अजून आपल्या रक्तात भिनले नाहीत म्हणून पुतळे उभे करायला लागतात आणि जयंती-पुण्यतिथी साजरी करावी लागते. त्यामुळे इतिहास वाचून वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या वागण्यातून आणि महाराष्ट्र पुढे कसा नेतोय याचा आनंद  त्यांना कसा मिळेल पे पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे".

"एक कायमस्वरुपी जागा उभी करुन प्रत्येक दालनात एका किल्ला असं एक दालन उभं करावी अशी कल्पना राज ठाकरेंनी यावेळी मांडली. हे सांगताना ते पुढे म्हणाले की, नाहीतरी भाजपाचे नेते सध्या मुख्यमंत्री माझं खूप ऐकतात असं म्हणाले. मी बोलून पाहीन, पण माहिती नाही. ही पण एक दंतकथाच आहे अर्थात. पण मी बोलण्याचा प्रयत्न करीन. असो  मी तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांना सांगून पाहतो. बघुयात रायगडाला जाग आली तर आली," असं ते अखेरीस म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES