SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

संजय राऊतांच्या 'त्या' दाव्याने खळबळ, सुनेत्रा- पार्थ पवारांची क्विक अ‍ॅक्शन, सर्व आमदारांना फोनाफोनी

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून दोन्ही पक्षांच्या मर्जरच्या चर्चा, खासदार संजय राऊत यांच्याकडून 22 आमदार शरद पवारांच्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 11:44 IST | Updated: Nov 13, 2026, 11:46 IST
Image Credit: NCP Merger news Sunetra Pawar office call all NCP MLAs after Sanjay Raut statement of 22 MLA will quit party
Join

राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. विलीनीकरणाबाबत वेगवान हालचाली सुरू असतानाच एक मोठी घडामोड समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन  केले जात असल्याची माहिती समोर येतेय.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन सुरु असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून फोन सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

सध्याच्या पक्षाबाबत माध्यमांत सुरू असलेल्या घडामोडींवर आपलं मत काय? विलीनीकरण करणे योग्य वाटत आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खरच संपर्क करण्यात आला का याबाबत विचारणा झाल्याची आमदारांची नाव न सांगण्याचा अटीवर माहिती दिली असल्याचे समोर येतेय.

पुण्यात पार्थ पवारांनी बोलावली बैठक

पुण्यात पार्थ पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे पदाधिकारी आणि ठराविक आमदारांची बैठक होत आहे. जिजाई निवासस्थानी पार्थ पवारांनी तातडीने बैठक बोलावली आहे. त्यानुसार आता
सात आमदार जिजाई निवासस्थानी असल्याची माहिती असून नुकतेच भोरचे आमदार शंकर मांडेकर बैठकीसाठी पोहचले आहेत. पार्थ पवारांनी बोलवलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मनात काय? याबाबत पार्थ पवार आमदारांची मतं जाणून घेणार आहेत. 

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिल्लीत

विलिनीकरणाची चर्चा असताना दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीत आहे. सुप्रिया सुळे संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. तर तटकरे, पटेल हे स्टँडिंग कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. तटकरे पेट्रोलियम नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत. बैठकांसाठी हे तिन्ही नेते दिल्लीत आहेत. मात्र विलिनीकरणाच्या अनुषंगाने दिल्लीत गाठीभेटी होणार का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES