• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुणेकरांना सावध करणारी बातमी, एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा, वाचा सविस्तर

पुणेकरांना सावध करणारी बातमी, एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा, वाचा सविस्तर

पुण्यात झिका व्हायरसचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 05, 2026, 10:43 AM IST|Updated: Oct 05, 2026, 10:45 AM IST
joinshare
पुणेकरांना सावध करणारी बातमी, एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा, वाचा सविस्तर
Image Credit: zika virus

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणेकरांना सावध करणारी एक बातमी समोर येत आहे. पाऊस तर परतला पण त्यानंतर आजारांत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यातच पुण्यात झिका व्हायरसचा प्रदुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे शहरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनआयव्हीच्या शास्त्रज्ञांनी 2024 मध्ये महापालिका हद्दीतील 16 ठिकाणी डासांचे सर्वेक्षण केले. 128 डासांच्या समूहांची तपासणी केली असता 34 समूहांमध्ये म्हणजेच 26.5 टक्के नमुन्यांमध्ये झिका विषाणूचे आरएनए आढळले. प्लॅस्टिक ड्रम, टाक्या, टायर यांसारख्या ठिकाणी डासांची पैदास आढळली.

पुण्यात 2024 मध्ये झिका विषाणूचा उद्रेक झाला होता. सद्यस्थितीत शहराच्या विविध भागांतील 128 डासांच्या समूहाची तपासणी केली असता त्यापैकी  अनेक समुहांमध्ये झिकाचे रेणू आढळले असल्याने पुण्यात झिका विषाणूचा धोका कायम आहे. डासामधील प्रादुर्भावामुळे भविष्यातही झिकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता देखील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या वतीने व्यक्त केली आहे.

झिका व्हायरसची लक्षणे कोणती?

झिका व्हायरसची लागण झालेल्या सुमारे 80 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तर काहींमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवतात.

ही आहेत प्रमुख लक्षणे

- सौम्य ताप: शरीराचे तापमान थोडे वाढणे.
- अंगावर पुरळ: त्वचेवर लालसर पुरळ किंवा डाग उठणे.
- सांधे आणि स्नायू दुखणे: हाता-पायांच्या सांध्यांमध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना होणे.
- डोळे लाल होणे: डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा दाह (नेत्रश्लेष्मलाशोथ / लाल डोळे
- डोकेदुखी: तीव्र किंवा हलके डोकेदुखी व थकवा जाणवणे

संसर्जित डास चावल्यानंतर साधारणपणे 3 ते 14 दिवसांच्या आत ही लक्षणे दिसून येतात आणि ती 2 ते 7 दिवस टिकतात

झिका व्हायरस उपचार

झिका व्हायरसवर कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषधोपचार उपलब्ध नाही, लक्षणे नियंत्रित करण्यावर भर दिला जातो.

पूर्ण विश्रांतीः शरीराला बरे करण्यासाठी भरपूर आराम करणे आवश्यक आहे.

भरपूर द्रवपदार्थः डिहायड्रेशन टाळण्यासाठी सतत पाणी आणि इतर द्रवपदार्थ पिणे गरजेचे आहे.

ताप आणि वेदना शमवणे: ताप व अंगदुखी कमी करण्यासाठी डॉक्टर पॅरासिटामोल घेण्याचा सल्ला देतात.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune News
Health News
Lifestyle News