• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /‘अजित पवारांच्या पुतळ्यालाही वाटत असेल की...’, ठाकरेंच्या शिवसेनेची अमित शाहांवर सडकून टीका; 'दादा माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत असतानाच रहस्यमय...'

‘अजित पवारांच्या पुतळ्यालाही वाटत असेल की...’, ठाकरेंच्या शिवसेनेची अमित शाहांवर सडकून टीका; 'दादा माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत असतानाच रहस्यमय...'

"अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याआधी भाजपने दादांवरील केलेल्या आरोपांबद्दल निदान माफी तरी मागायला हवी होती," असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 18, 2026, 06:36 IST|Updated: Nov 18, 2026, 06:47 IST
joinshare
‘अजित पवारांच्या पुतळ्यालाही वाटत असेल की...’, ठाकरेंच्या शिवसेनेची अमित शाहांवर सडकून टीका; 'दादा माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत असतानाच रहस्यमय...'
Image Credit: ठाकरेंच्या शिवसेनेचा केंद्रीय गृहमंत्र्यांवर हल्लाबोल (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

"गृहमंत्री अमित शहा दोन दिवस पुण्यात होते. पुण्यातील काही कार्यक्रमांच्या निमित्ताने शहा यांनी केलेली भाषणे आणि विधाने हास्यास्पद ठरली आहेत. पुणे, पिंपरी वगैरे शहरे ही शहाण्यांची, विद्वानांची आणि क्रांतिकारकांची म्हणून ओळखली जातात याचा विसर देशाच्या गृहमंत्र्यांना पडलेला दिसतो, हे त्यांनी पुण्यात जे तारे तोडले त्यावरून स्पष्ट दिसते," असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. "शहा यांनी पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. अजित पवारांचा पुतळा पाहून ते भावुक झाले, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले असल्याचे वृत्तवहिन्यांत सांगितले. अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी शहा यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती शोधायला हवी होती, असे अजित पवार चाहत्यांचे म्हणणे पडले. शहा यांनी आपल्या पुतळ्याचे केलेले अनावरण अजितदादांच्या आत्म्यासही आवडले नसेल," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मोदी यांनीही दादांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून...

"हेच ते अमित शहा ज्यांनी फडणवीसांच्या मदतीने अजितदादांचा मानसिक, राजकीय आणि भावनिक छळ केला होता. अजित पवार यांच्यामागे ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला. त्यांच्या साखर कारखान्यांवर जप्ती आणली. त्यांना अटकेची भीती दाखवून पवार कुटुंबात फूट पाडली. पक्ष सोडायला लावला. पंतप्रधान मोदी यांनीही दादांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडवली होती. असे बेबंद आरोप करून एखाद्याची बदनामी करणे हे पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभते काय?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

दादा माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत असतानाच...

"आता अमित शहांनी दादांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणगान केले व पुतळ्याचेही अनावरण केले हे दादांच्या हितचिंतकांना आवडले नसेल. दादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याआधी भाजपने दादांवरील केलेल्या आरोपांबद्दल निदान माफी तरी मागायला हवी होती. ‘‘शहा-मोदी माफी मागा’’ अशी मागणी सुनेत्रा पवार, पार्थ पवार वगैरेंनी करायला हरकत नव्हती, पण दादांची झालेली कोंडी तशीच ठेवून त्यांचे कुटुंबीयही शहांच्या गोतावळ्यात शिरले. दादांना भाजपबरोबर गेल्याचा मानसिक त्रास होत असे. भाजपचे लोक सरळमार्गी नाहीत, ते कपटी आहेत हे दादांना पटले होते व ते माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत असतानाच त्यांचा रहस्यमय अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची नीट चौकशीही गृहमंत्री शहांनी केली नाही," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे. 

त्या पुतळ्यालाही वाटत असेल की...

"रोहित पवार यांनी या संशयास्पद अपघाताबाबतचे पुरावे घेऊन जंग जंग पछाडले, पण गृहमंत्र्यांनी काहीच केले नाही. साधा एफआयआर दाखल झाला नाही. त्या अमित शहांकडून दादांच्या पुतळ्याचे अनावरण करून घेणे बरे नव्हते. दादा म्हणजे सामान्य जनतेचा नायक होते. एखाद्या सामान्य शेतकऱ्याकडून दादांच्या पुतळ्याचे अनावरण झाले असते तरी चालले असते. आता शहांनी ते अनावरण केले. त्यामुळे त्या पुतळ्यालाही वाटत असेल की, ज्यांच्यापासून मी पळत होतो तेच पुतळ्याच्या अनावरणासही आले," असं अग्रलेखात म्हटलंय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Amit Shah
Shiv Sena UBT
Ajit Pawar