• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत; निकालानंतर सतेज पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; पहिली जाहीर प्रतिक्रिया

गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत; निकालानंतर सतेज पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; पहिली जाहीर प्रतिक्रिया

गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत असा पहिला मोठा गौप्यस्फोट सतेज पाटील यांनी केला आहे. निकालानंतर सतेज पाटील यांनी पहिली जाहीर प्रतिक्रिया दिली.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 10, 2026, 18:39 IST|Updated: Nov 10, 2026, 18:45 IST
joinshare
गोकुळचे 4 सरकार नियुक्त संचालक 4 महिन्यानंतर राहणार नाहीत; निकालानंतर सतेज पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; पहिली जाहीर प्रतिक्रिया

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gokul Election : फडणवीसांनी डोळे वटारले तरी तुमचं साम्राज्य संपेल असं म्हणत मंत्री चंद्रकात पाटील यांनी सतेज पाटलांना थेट इशारा दिला. तर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मला धमकी देऊ नका मी देखील पाटीलच असं म्हणत सतेज पाटलांनी ठणकावल आहे. यावेळी एक मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. 

सत्ता मिळवण्यासाठी 4 लोकांना मतांचा अधिकार दिला. शासन नियुक्त संचालक यांच्या सहा महिन्याचे अनुभव पत्र तयार केली. चेअरमन निवडी पुरती या 4 लोकांची नियुक्ती होती.  चार महिन्यानंतर हे चार संचालक राहणार नाहीत ही आतली बातमी आहे असा गौप्यस्फोट सतेज पाटील यांनी केला. 

आमचे 13 उमेदवार निवडून आले आहेत आमची कोर्टात बाजू मांडू.  'सत्तेचा गैरवापर कसा होतो? हे 'गोकुळ'मध्ये दिसलं' न्यायालयीन लढाईमध्ये आम्हाला यश मिळणार असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटवून घ्या म्हणणं आणि धनंजय महाडिक यांनी तसं काय होणार नाही म्हणणं, हे आम्हाला गाफील ठेवायचं होत. या नियुक्तीला कोरम  लागत नाही. केवळ गोकुळची सत्ता मिळावी म्हणून 4 नागरिकांना संचालक केले. चार मत वेगळी ठेवण्यात आली आहेत. कालचा मोर्चा महायुतीच्या नेत्यांना जिव्हारी लागला. काही नेते म्हणत होते मोर्चाला येणार नाही म्हणत होते त्यांना चपराक बसली. तमाम लोक अन्याय होतो म्हणून मोर्चाला आले असं सतेज पाटील म्हणाले. 

 स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांच्यावर बोलून काय मिळवलं
आज महायुतीच्या नेत्यांचे चेहरे कसे होते हे पाहिलं आहे. चंद्रकांत दादा मोठे होत असताना त्यांची वैचारिक पातळी खालावत आहे.  मी आणि चंद्रकांत दादा 10 वर्षे एकमेकांविरोधात लढत आहोत. पण स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांच्यावर बोलून काय मिळवलं. मी देखील पाटील आहे. 2029 मध्ये एकमेकांच्या विरोधात उभा राहूया. पण सत्तेची भीती खालून धमकी द्यायची नाही. हे कोल्हापूरकर आणि महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा सतेज पाटील यांनी दिला. 

2014 साली उमेश आपटे यांची मदत झाली नसती तर काय झालं असतं हे हसन मुश्रीफ यांनी लक्षात ठेवावं. आता बोलताना हसन मुश्रीफ यांनी समविचारी संचालकांना इशारा दिला आहे. शासनाची व्यवस्था कशी वापरू शकतो हे हसन मुश्रीफ यांनी दाखवून दिलं. लवटहुकूम काढून कोणत्याही संस्थेची सत्ता काबीज करू शकतात. म्हणून आम्ही विरोध करत होतो.

धनंजय महाडिक यांनी आधी आपल्या भीमा साखर कारखाना सुरुळीत चालवावा. तिथल्या कामगारांना पगार दिला जात नाही. त्या कारखान्यावर जप्ती आली ते आधी बघा. मी बंटी पाटील राहणं पसंद करेन. मला साहेब न होता महाराष्ट्राच्या मनात मी बंटी पाटीलच योग्य आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवले असं म्हणत सतेज पाटील यांनी  चंद्रकांतदादा पाटील यांना टोला लगावला.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Kolhapur