• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या मंत्र्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार; विवेकानंद पाटील यांची भर सभेत मोठी घोषणा; मंत्र्याचे नाव जाणून चकित व्हाल

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या मंत्र्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार; विवेकानंद पाटील यांची भर सभेत मोठी घोषणा; मंत्र्याचे नाव जाणून चकित व्हाल

विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील यांनी भर सभते भाजपच्या बड्या मंत्र्याला ओपन चॅलेंज दिले आहे. या मंत्र्याविरोधात थेट निवडणूक लढण्याची घोषणा विवेकानंद पाटील यांनी केली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 09, 2026, 16:13 IST|Updated: Nov 09, 2026, 17:19 IST
joinshare
महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या मंत्र्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार; विवेकानंद पाटील यांची भर सभेत मोठी घोषणा; मंत्र्याचे नाव जाणून चकित व्हाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

विवेकानंद पाटील :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.  महायुती सरकारच्या भूमिकेविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा  काढण्यात आला. या मोर्चात  विद्यार्थी नेता विवेकानंद पाटील देखील सहभागी झाले. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या मंत्र्याविरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हा मंत्री जेथून अर्त भरणार तिथून मी निवडणुकीचा फॉर्म भरणार असं ओपन चॅलेंजच विवेकानंद पाटील यांनी दिले. 

अध्यादेश कसा निघाला?

कोरमसाठी नेमलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार कशासाठी? सरकारने लोकमताचा आदर केला पाहिजे असा टोला विवेकानंद पाटील यांनी सरकारला लगावला आहे. काही लोक गोकुळवर डोळा ठेवून मागल्या दाराने शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी संचालक नियुक्तीचा घाट घातला जात आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्हाला यात पडायचे नाही मग एका रात्रीत अध्यादेश कसा निघाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

नाव न घेता चंद्रकांत पाटील यांना खुले चॅलेंज

गोकुळच्या या षडयंत्रामागे  कोल्हापूरातील नाकारलेला एक मंत्री आहे. ते कोल्हापूरात नसतात. ते सध्या पुण्यात राहतात. एका नेत्याच मी फोटो पाहिला. तो अमुलचं चॉकलेट देतयं... दुसरं चॉकलेट मिळाले नाही. माझ खुलं चॅलेंज आहे. कोल्हापूरच्या विधानसभेत कोणताही कुठलाही फॉर्म भरावा मी अपक्ष उभा राहिल नाही. नाही तर मी कोथरुडमध्ये जाऊन फॉर्म टाकतो असं म्हणतं   विवेकांनद पाटील यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटील यांना खुले चॅलेंज दिले आहे. 

मंत्रालयात कंसमामा बोट मोडितो

29 ला मत मागितलेल्यांना हात दाखवा, लाथ दाखवली तरी चालेल. गोकुळच्या मोर्चात येत असताना मी ना राष्ट्रवादीचा माणूस, ना काँग्रेस, ना शिवसेनेचा, ना स्वाभिमानीचा, मी फक्त इथे शेती करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आलो आहे. मागील 10 ते 15 दिवस गोकुळमध्ये काय खेळ सुरु आहे? हे सर्वचजण पाहत आहेत. गोकुळात नंदा घरी कृष्णा वाढतो आणि मथुरेत कंसमामा बोट मोडीतो असं गाण आहे. पण काळ आता बदलला आहे. गोकुळात नंदा घरी कृष्णा वाढवितो, आणि मंत्रालयात कंसमामा बोट मोडितो. अशी अवस्था आमच्यावाटेला आली आहे असं विवेकानंद पाटील म्हणाले.

गोकुळचे संचालक आहेत किती? 

गोकुळने 25 संचालक कोल्हापूरला दिले आहेत. या 25 मध्ये बंटी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी लढली. 13 जागा जिंकल्या.  विरोधकांना 12 मिळाल्या. जर कोल्हापूरने बंटी पाटील यांना बहुमत दिलंय तर तिथला चेअरमॅन हा त्यांच्याच बहुमताचा बसला पाहिजे. पक्ष संघटना युत्या आघाड्या याचं आम्हाला काही देण घेण नाही. फडणवीस म्हणतात गोकूळच्या सत्तेत आम्हाला रस नाही. पण तुम्हाला.  कोल्हापूरचा गोकुळ हा फक्त एका जिल्हापुरती आहे असं ते म्हणातात. ते निवडणार आहे तो चोरमन आहे आम्हाला आमच्या हक्काचा चेअरमन पाहिजे असं ठाम मत विवेकानंद पाटील यांनी मांडले. 

शेतकऱ्याच्या गाढवाला हवामान खात्यात नियुक्त केलं

शहरात आम्हाला भैय्या म्हणातात. एक राजा शिकारीला निघाला. तर लवाजमा सोबत होता. शेतकरी म्हणाला शिकारीला जाऊ नका पाऊस पडेल. आणि धो धो पाऊस पडला. राजाने त्या शेतकऱ्याला बोलावून विचारले पाऊस कसा पडला तेव्हा त्याने सांगितले माझ्या गाढवाने मला पावसाचा अंदाज दिला. पाऊस पडणार असल्यावर माझा गाढव कान वर करतो. राजाने विचारले त्याना हवामानातील कळते का? यानंतर राजाने शेतकऱ्याच्या गाढवाला हवामान खात्यात नियुक्त केले. यानंतर सर्व गाढवांनी मोर्चा काढून आमच्या सर्व बांधवाना हवामान खात्यात भरती करण्याची मागणी केली. अशी अवस्था सध्या सुरु असल्याचे विवेकानंद पाटील म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Kolhapur