पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचा अध्यक्ष
गोकुळ अध्यक्षपद निवडणूक - पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, धनंजय महाडिक यांची माहिती
Kolhapur Gokul Dairy polls: गोकुळचा आज फैसला होणार असून, 13 विरुद्ध 12 च्या लढतीत 4 शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सतेज पाटील यांचा समविचारी आघाडीचा की महायुतीचा अध्यक्ष होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीचे सर्व अपडेट्स येथे जाणून घ्या
गोकुळ अध्यक्षपद निवडणूक - पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार, धनंजय महाडिक यांची माहिती
गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय
गोकुळ दुध संघावर महायुतीची पकड.
महायुतीच्या उमेदवाराला 29 पैकी इतकी 16 मतं तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चूयेकर यांना 13 इतकी मतं.
समविचारी पॅनेलचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव, समविचारी आघाडीला मोठा धक्का.
पहिल्या टप्यात निवडून आलेल्या संचालकांची मतमोजणी पार पाडली, त्यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मत मिळाली तर राजेश पाटील याना 12 मतं मिळाली.
दुसऱ्या टप्यात शासन नियुक्त मतमोजणीत राजेश पाटील याना 16 मतं तर शशिकांत पाटील चुयेकर याना 13 मतं मिळाली.
थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार
राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष, धनंजय महाडिक यांनीही केली घोषणा
कोल्हापूर - मंत्री हसन मुश्रीफ
गोकूळच्या बाबतीत माझ्याही काही भावना आहेत
पहिल्यांदा आमच्या आमच्या मध्ये फाजील आत्मविश्वास या परिस्थितीमध्ये ही निवडणूक झाली.
आपापसातल्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मंडळींनी केला.
सरकारचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले पाहिजे
वैधानिक संकट सोडवण्यासाठी अध्यादेश आणल्याचं सांगितलं आहे
दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असेल तर अध्यादेश मागे घेतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं
पण दुसऱ्याच दिवशी पेपरच्या पहिल्या पानावर मोर्चाच्या जाहिराती दिल्या आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला
शुक्रवार आमचा कब्जा करायचा प्रयत्न नव्हता असं मुख्यमंत्री यांनी सांगितला आहे
आम्हाला रेडा दाखवण्याचा प्रयत्न झाला की भाषण कोणी केले आपल्याला माहित आहे मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला
आमचा अपमान जरी झाला तरी आम्ही उन्माद करण्याचा प्रयत्न करणार नाही
होय,मी चंद्रकांत पाटील,प्रकाश आंबेडकर सर्वच नेत्यांनी पुढाकार घेतला होता
प्रशासक आला असता तर 13 संचालकांना घरी जायची वेळ आली असती
मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत
बंटी पाटील या आधी तुम्ही दोन निवडणुका लढवल्या,मीही लढवल्या होत्या,आपण दोघे एकत्र आल्यावर सत्ता आली होती.
तुम्ही एवढे मोठे झाला नाही की माझा हात धराल
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही ग्रह राज्यमंत्री झाला आणि बंटी आणि बबली जोडी झाली
मी नसतो तर तुम्ही मंत्री झाला नसता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गोकुळ अध्यक्ष निवडीवरही भाष्य केलं आहे. गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. गोकुळ संदर्भात आधीही सांगितलं की, एका प्रकारे वैधानिक पेच निर्माण झाला. कोरम पूर्ण होत नव्हता. एकाच्या भरोश्यावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. डीडीआर पण असतो, मात्र कोरमसाठी बहुमत नाही लक्षात आल्यावर निर्णय झाला आहे. मी संस्थेच्या पाठीशी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
"मी कायद्याच्या आणि संस्थेच्या बाजूने आहे. चंदगडचे राजेश पाटील यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असल्याचे समजते. वैधानिक पेच निर्माण झाला. 14 चा कोरम कुणीही गाठू शकत नव्हतं. सरकारला कब्जा घ्यायचा असते तर अगोदरच घेतला असता. दोघांकडे कोरम नसल्याने 4 लोकं टाकली आहेत. हायकोर्टाने अंतिम निकालापर्यंत चार लोकांची मते ठेवायला सांगितली आहेत. बंटी पाटील, मुश्रीफ आणि सावकार यांनी एकत्रित बसण्यास सांगितले होते. पाच हजार मतदारांच्या संस्थेत राहूल गांधी उतरले. सहकार क्षेत्रातील चारही जणांचा अनुभव आहे. गायनॅकॅालिजिस्टने सहकारात जावू नये का? देशातील विरोधी पक्षनेता लक्ष घालतोय तर गायनॅकोलॅाजिस्ट का नाही," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या निवडणुकीत लक्षात आलं की ते बंटीचा आहेत आणि ते बंटी साहेब झाले नाहीत
एखाद्या लहान मुलाला खेळणे मिळाले नाही की तो त्रागा करतो,तसे 15 दिवसात सुरू होते.
लहान मुलांसारखं वागल्यामुळे लोकांमध्ये एक गोष्ट निर्माण झाली की हा बंटीच आहे बंटी साहेब झाला नाही
राहुल गांधींनी कोल्हापूर काढल्याने जगामध्ये 212 देशांमध्ये गोकुळचे नाव पोहोचले,
पण ते शिव्या शाप देऊन पोहोचायला नको होतं
तुम्ही ज्या पक्षाच्या पक्षाच्या इंदिरा गांधींनी देशाची घटना बदलली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या हितासाठी अध्यादेश बदलला
इंदिरा गांधींनी आणीबाणीत खूप काही केले,
तू आता मला लोकशाही शिकवणार,घटना शिकवणार
जनादेश तुडवून तुम्ही उद्धवजींचं सरकार केलं आणि तुम्ही आम्हाला जनादेश शिकवता का
सोनिया गांधी यांना व्हिडिओ कॉल करून बंटी पाटील दम देत होते
शिवसेना ठाकरेंसोबत सत्ता करण्याबाबत
काँग्रेस-राष्ट्रवादीके साथ उद्धवजी के साथ नही गये तो आम्ही वेगळा गट बनवणार
ती मतचोरी होती आणि ते जनादेश पायदळी पुरवण्याचा होतं
22 मध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडले,
तुम्ही जे कराल ते योग्य आणि मुश्रीफ साहेब कराल ते आरोग्य हे चालणार नाही..
हम किसी को टोकेंगे नही,कभी किसी के हमे टोका तो हम छोडेंगे नाही
आपली उंची पाहून काम करा
आमच्यावर बोलू नका,आमच्यावर बोललं तर तुम्ही काचेच्या घरात राहतात,
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायची नसतात
तुमचे वडील डी वाय पाटील स्कुटरवरून फिरत होते..आता तुमची प्रॉपर्टी डिक्लेअर करा कुठून आली एवढी प्रॉपर्टी जाहीर करा.
स्वतःला मलाई खाण्यासाठी आहे..
जा राहुल गांधीकडे जा मुख्यमंत्र्यांकडे कशाला जातो यापुढे मुख्यमंत्री यांच्याकडून मध्ये जाऊ नको
लेव्हल सोडून बोलतात, तेल लावलेला पैलवान देवेंद्र फडणवीस आहेत ते कोणालाही सोडत नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागू नका मुलगी होऊन साखर खायची असते
तुमची जागा कधी दाखवले हे सांगता येणार नाही
राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत अशी घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मतमोजणीआधीच हसन मुश्रीफ यांनी हे जाहीर करुन टाकलं आहे.
रस्त्यावरची लढाई कोणी लढत असेल तर त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये आहे,
आपला चेअरमन आपण करतंय..
आम्ही सगळे एकत्र यायला पाहिजे होतं,
परमेश्वर कोणाच्या बाजूने जिवंत उदाहरण आहे.
तुमचा एक संचालक जादा आला म्हणून तुम्हाला चेअरमन करायसाठी निवडून दिलेले नाही
महाराष्ट्र सरकारला तुम्ही चॅलेंज करता पण तुम्ही खरंच बहुमतावर आला का याचा विचार करायला पाहिजे
अमोल दूध संघ नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला.
आम्ही शब्द देतो कोल्हापूर मध्ये अमोल दूध संघाला येऊ देणार नाही.
सतेज पाटलांच्या उत्तर देण्यासाठी महायुतीची सभा सुरु झाली आहे.
आता गोकुळमध्ये 13 विरुद्ध 12 या निवडून आलेल्या संचालकांच्या संख्याबळासोबतच 4 शासननियुक्त संचालकांच्या मतांची भर पडणार आहे. त्यामुळे समविचारी आघाडीचं बहुमत धोक्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या गोकुळ शिरगाव MIDC मधे असणाऱ्या गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्ष निवड पार पडणार आहे.
या निवडीसाठी निवडून आलेले संचालक : 25
त्यामध्ये समविचारी आघाडीचे 13
महायुतीचे 12 संचालक मतदान करणार आहेत.
शासननियुक्त 4 संचालक देखील उपस्थित असणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र ठेवली जाणार आहेत.
या संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रिकरण होणार.
गोकुळ दूध संघ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या कार्यालयाबाहेर माहितीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.राष्ट्रवादीचे युवा नेते नाविद मुश्रीफकडून देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सोबत जल्लोष करण्यात येत आहे,गोकूळचा अध्यक्ष महायुतीचा होईल, साडेपाच लाख सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील दूध दरवाढ असेल किंवा शेतकऱ्यांच्या सभासदांचे अन्य प्रश्न महायुती सोडवेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीकडून राजेश पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज
समविचारी आघाडीकडू शशिकांत पाटील चूयेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज
शासन नियुक्त संचालकना मतदानाचा अधिकार देऊ नका, सतेज पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवला आक्षेप
एकीकडे गोकुळ अध्यक्ष पद निवड प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे महायुतीची गोकुळ चौकात सभा सअसणार आहे. सभेला महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि इतर जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
१ नामनिर्देशन पत्र वाटप व स्विकृती स.११.१५ ते स.११.४५
२ नामनिर्देशन पत्र छाननी स.११.५० ते दु.१२.२०
३ वैध नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्दी दु.१२.२५
४ नामनिर्देशन पत्र माघार --- दु.१२.२५ ते दु. १२.५५
५ अंतीम उमेदवाराची यादी जाहीर करणे --- दु.०१.१०
६ मतदान प्रक्रिया -- दु.०१.२५ ते दु. ०१.५५
७ मतमोजणी प्रक्रिया ---- दु.०२.०० ते दु. ०२.३०
८ निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित केला जाईल