SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी होणाऱ्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 04:21 PM IST | Updated: Oct 29, 2026, 04:39 PM IST
Image Credit: मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Join

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी होणाऱ्या आरोपानंतर मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची ठाण्यात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचाही सहभाग असल्याचा आरोप ठाकरेंची शिवसेना आणि पूर्णेकर कुटुंबीयांचा आहे. त्यांनाही अटक केली जावी अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.

"मीनाक्षी शिंदे यांनी माझ्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी झालेली घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. पूर्णेकर हत्या दुर्देवी आणि दु:खद असल्याचं मीदेखील सांगतो. पण इतर राजकीय पक्ष त्याचं राजकारण करत आहेत ते जास्त दुर्देवी आहे. त्यांचं नाव वारंवार या घटनेशी वारंवार जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याची भावना व्यक्त करुन त्यांनी राजीनामा दिला आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा - मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरण भोवलं, पत्रात म्हणाल्या ‘माझ्यामुळे...’

"कायदेशीर बाबी सुरु आहेत. पोलिसांनीही बुलेटिन जारी केलं की, आरोपींना अटक केली असून तपास सुरु आहे. मी पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्तांना फोन करुन घटनेची गंभीर दखल घेतली. हा तपास निष्पक्षपणे झाला पाहिजे, कोणाला पाठीशी घालण्याचं कारण नाही असं सांगितलं. त्यामुळे इतक्या जलदगतीने आरोपी पकडले गेले आहेत, शस्त्रं जप्त केली आहेत," असं ते म्हणाले.

"कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचं किंवा जनतेला वेठीस धरण्याचं काम करु नये. त्यांनी त्याचं काम निर्भयपणे केलं पाहिजे. आणि जनतेला नाहक त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आम्ही पूर्णेकर कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. पोलिसांनाही योग्य आणि निष्पक्ष चौकशी कऱण्यास सांगितलं आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा," अशी माहिती त्यांनी दिली. 

ठाण्यातील बाहेरचे लोक येऊन ठाणेकरांना त्रास देत असून, हे वारंवार सुरु आहे. परवा रात्री जाळपोळ केली, हायवे बंद झाला, पोलिसांवर दगडफेक झाल, पोलीस जखमी झाले. पूर्णेकर कुटुंबाच्या घटनेवर राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत हे दुर्देवी आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

कोणत्याही स्थितीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं आपलं काम आहे.वाहतूक कोंडी होता कामा नये हे मी सांगितलं आहे. शिवसेनच्या वतीने कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची काळजी शिवसेना घेईन असं सांगत त्यांनी पक्षाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES