खोपोली शीळफाट्यावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! रस्ता चुकताच बसचा ब्रेक फेल झाला अन्...; 13 ते 14 प्रवासी जखमी, मृत्यूचीही शक्यता
दुर्घटनेत 13 ते 14 प्रवासी जखमी झाले असून, काहींचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
खोपोलीच्या शीळ फाट्यावर बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस स्वस्तिक टूल्स अँड ट्रॅव्हल्सची आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत 13 ते 14 प्रवासी जखमी झाले असून, काहींचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही
ही बस सुरतहून पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. महड येथे दर्शन घेतल्यानंतर प्रवासी पालीकडे जात होते. मात्र, रस्ता चुकल्याने बस खोपोली गावात पोहोचली. त्यानंतर खोपोलीतून पुन्हा पालीच्या दिशेने जात असताना शीळ फाट्यावर हा भीषण अपघात घडला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहराच्या बल्लारपूर वळणमार्गावर ट्रक उलटला
चंद्रपूर शहराच्या बल्लारपूर वळणमार्गावर ट्रक उलटला. कुक्कुट खाद्य भरून असलेला ट्रक वळणावर उलटल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. शहराबाहेर निघणाऱ्या प्रसंग पेट्रोल पंप वळणावर हा ट्रक उलटल्याने वाहतुकीची काही काळ कोंडी झाली. तीव्र वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तीन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील ट्रक बाजूला सारत विखुरलेली पोती उचलल्यावर वाहतूक सुरळीत झाली. हा ट्रक तेलंगणा राज्यात जात होता.
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात
सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमानाचा अपघात झाला आहे. शिकाऊ वैमानिकाने विमानाचे टेक ऑफ घेताना धावपट्टीवरून विमान घसरलं. मानाने उड्डाण घेण्यापूर्वीच धावपट्टीवरून खाली गेल्याने अपघात झाला. सुदैवाने विमानातील शिकाऊ वैमानिक महिलेला कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून याबाबत अद्याप कोणती अधिक माहिती देण्यात आलेली नाही.