• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी मोठी कारवाई! फरार दोन मुख्य आरोपींनाही अटक; गोव्याला पळून जाताना कर्नाळा अभयारण्यात ठोकल्या बेड्या

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी मोठी कारवाई! फरार दोन मुख्य आरोपींनाही अटक; गोव्याला पळून जाताना कर्नाळा अभयारण्यात ठोकल्या बेड्या

निखिल यादव आणि नितेश पवार हे दोघेही गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जात असताना कर्नाळा अभयारण्य परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 02, 2026, 05:53 PM IST|Updated: Oct 02, 2026, 06:00 PM IST
joinshare
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी मोठी कारवाई! फरार दोन मुख्य आरोपींनाही अटक; गोव्याला पळून जाताना कर्नाळा अभयारण्यात ठोकल्या बेड्या

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या तपासाला मोठं यश मिळालं आहे. सलग तिसऱ्या दिवशी कारवाई करत उर्वरित चार फरार आरोपींपैकी दोन मुख्य आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार हे दोघेही गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जात असताना कर्नाळा अभयारण्य परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून हत्येच्या कटामागील अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात हजर करण्यात आले असता दोघांना 8 ॲाक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या हत्याकांडाचे नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. हत्येच्या प्रकरणातील उर्वरित चार फरार आरोपींपैकी निखिल यादव आणि नितेश पवार या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. दोन्ही आरोपी गोव्याच्या दिशेने रस्ते मार्गाने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र गुन्हे शाखेने सापळा रचत कर्नाळा अभयारण्य परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या कारवाईसाठी पोलिसांना मिरा रोडमधून मिळालेल्या माहितीचा मोठा धागा मिळाला. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हे शाखेने मिरा रोड परिसरातून काही संशयित महिलांना ताब्यात घेतलं होतं. या महिला फरार आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिलांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना काही ठिकाणांची माहिती दिली. याच माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने तपासाची दिशा निश्चित केली आणि सापळा रचत अखेर निखिल यादव आणि नितेश पवार यांना ताब्यात घेत अटक केले

निखिल यादव हा याच परिसरातील एका वडापावच्या गाडीवर काम करत असल्याची माहिती आहे. तर नितेश पवार हा त्याचा साथीदार असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे, हत्या घडली त्यावेळी हे दोन्ही आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं बोललं जात आहे. निखिल यादव याने हातवारे केल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून या हत्याकांडातील अनेक महत्त्वाचे प्रश्न उलगडण्याची शक्यता आहे.   प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार नेमका कोणी केला? धारदार शस्त्राने हल्ला कोणी केला?
हत्येचा कट कुठे आणि कसा रचला गेला? आणि या संपूर्ण हत्याकांडामागचा सूत्रधार नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरं आरोपींच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे. मात्र तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण पाच आरोपी दिसून येत असल्याची माहिती आहे. यापैकी चार आरोपींची ओळख पटली आहे. मात्र पाचव्या आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या हत्याकांडात आणखी आरोपींचा सहभाग आहे का, याचाही तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

दुसरीकडे, प्रदीप पुर्णेकर यांचं कार्यालय तुलनेने छोट्या स्वरूपाचं असल्याची माहिती आहे. कार्यालयाच्या आत गोळीबार झाल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींना गोळी का लागली नाही, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील घटनाक्रम नेमका कसा घडला, याचा तपशील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी आणि आरोपींच्या चौकशीतून जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

याचसोबत प्रदीप पुर्णेकर ज्या बिल्डरविरोधात आंदोलन करणार होते, त्या बिल्डरचीही गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.  बिल्डरशी संबंधित अँगलसोबतच राजकीय आणि इतर संभाव्य अँगलचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे आता अटक करण्यात आलेले निखिल यादव आणि नितेश पवार तपासात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या दोघांच्या चौकशीतून केवळ गोळीबार आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची भूमिका स्पष्ट होणार आहे की, या संपूर्ण हत्याकांडामागचा मास्टरमाइंडही समोर येणार? याचं उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Thane
crime