SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

राजीनामा दिल्यानंतर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, 'माझ्यावर जे आरोप...'

ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून अखेर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्या दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 11:31 AM IST | Updated: Oct 31, 2026, 12:17 PM IST
Image Credit: Minakshi Shinde
Join

ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सातत्याने माजी नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप होत आहेत. मीनाक्षी शिंदेंनी राजीनामी द्यावा अशी मागणी गेल्या महिनाभरापासून होत होती. अखेर मीनाक्षी शिंदे यांनी  एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यांनी दिलेल्या पत्रात  शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे. राजीनाम्या दिल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मीनाक्षी शिंदे राजीनाम्याबद्दल काय बोलल्यात?

मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात की, मी राजीनाम दिला असून यावर मी लवकरच बोलणार आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावर मी लवकर भूमिका स्पष्ट करेल. मी पहिलेली बोले होते त्यानुसार पोलिसांना चौकशीत सहकार्य करत असून पोलिसांसमोर चौकशीला बोलल्यावर मी जात आहे. तर मी ⁠योग्य वेळी मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.

राजीनाम्या पत्रात काय लिहिलं?


मीनाक्षी शिंदेंनी पत्रात लिहिलं की,  गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षांतर्गत माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वबाबींचा एकत्रित वेध घेऊन माझ्यावर विविध आरोप करता पक्ष नेतृत्वाचा अर्थात मुख्य नेते व पक्षांतर्गत म्हणून आपणास वेढीस धरण्याचे जे षड्यंत्र चालू आहे ते पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते अशा भावना त्यांनी मांडल्या  आहेत.

ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, हे कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे.

माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES