SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

ठाण्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदीप पूर्णेकरांची हत्या झाल्यापासून तापलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद आता थेट रस्त्यावर दिसू लागले असून या प्रकरणामध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 11:41 AM IST | Updated: Oct 28, 2026, 12:07 PM IST
Image Credit: पत्रकारांसमोर मांडली भूमिका (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
Join

"शिवसेना आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं तर आम्ही सहन करणार नाही," असा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिला आहे. ठाण्यामध्ये आनंद आश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कालपासून ठाण्यात प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबियांकडून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचं ही पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे उद्या ठाण्यामध्ये पूर्णेकर प्रकरणावरुन आमदार आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आलेली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे.

...तर ठाण्यातून परत जाणार नाही

यामागे पूर्ण षड्यंत्र रचलं गेलं आहे. कुठे मिटींग झाल्या, कुठे हे ठरलं सगळं माहिती आहे. आम्ही जशास तसं उत्तर देऊ. जर तुम्ही ठाण्यात येऊन वाटेल तशा पद्धतीची वक्तव्य करणार असाल तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही, असा इशारा नरेश म्हस्केंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता दिला. मात्र त्यांचा हा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे असल्याचं स्पष्ट होत आहे. "आमचा अंत पाहू नका. चुकीच्या पद्धतीने वागाल तर तसेच उत्तर आम्ही देऊ," असं म्हस्के म्हणालेत. 

पूर्णेकर कुटुंबाला आवाहन

शिंदेने 17 लाख रुपये देऊन माणूस पाठवला होता असे आरोप करण्यात आले. माझं आव्हान आहे हा आरोप सिद्ध करा. त्या माणसाला समोर आणावं. चुकीच्या पद्धतीने आरोप करु नये, असं म्हस्के यांनी म्हटलं आहे. पूर्णेकरांच्या कुटुंबासोबत आहोत आम्ही. त्यांचं समधान झालं नसेल तर त्यांनी एसआयटीला भेटावं, आपणं म्हणणं सांगावं. त्यांनी विरोधकांच्या दबावाला बळी पडू नये. काही गोष्टी विरोधकांना साध्य करता आलं नाही. विधानसभेत, लोकसभेत काही करता आलं नाही आता असं वागणार असाल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असं म्हस्केंनी म्हटलं आहे. "सुपारी घेऊन शिंदेंविरुद्ध बोलणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करु," असंही म्हस्केंनी म्हटलं आहे. आपण नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हे दाखल करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

शिंदेंच्या घरासमोर आंदोलन करण्याची गरज काय?

आमदार प्रताप सरनाईक यांनी, काल मानपाड्यामध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये काही पोलिसांवरही हल्ला झाल्याचा खळबळजनक दावा केला. तसेच शिंदेंकडून पूर्णकर प्रकरणाची दखल घेऊन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्यांच्या घऱासमोर आंदोलन करण्याची काय गरज होती? असा सवाल सरनाईक यांनी केला आहे. सरनाईक यांनी हवी ती कायदेशीर मदत पूर्णेकर कुटुंबाला करायला आम्ही तयार आहोत, असंही म्हटलं. प्रदीप पूर्णेकरांचे पुत्र राम पूर्णेकरांनी काल एकनाथ शिंदेंच्या काजुवाडीतील घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला असता त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यावरुनच सरनाईक यांनी शिंदे सर्व मदत करत असताना या आंदोलनाची गरज काय असा सवाल केला आहे. सरनाईक यांनी या प्रकरणामध्ये पोलिसांना मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीच्या नावाचा तक्रारीत उल्लेख करण्यास दबाव टाकण्यात आल्याचंही विधान केलं. 30 सप्टेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी या प्रकरणात ठाण्यात येऊन पोलिसांची भेट घेतल्यानंतर या घडामोडी घडल्या होत्या. त्याचसंदर्भातून सरनाईक यांनी हे विधान केलं.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्या आंदोलन

दरम्यान, याच प्रकरणामध्ये पूर्णेकरांच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्या या मागणीसाठी उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ठाण्याच्या जांभळी नाका येथे सर्वपक्षीय 'भयमुक्त ठाणे' ना मथळ्याखाली आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाला आदित्य ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे स्वत: ठाणे पोलीस आयुक्तांना भेटून पूर्णेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी करणार आहेत. प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्यावा, सूत्रधार असलेल्या शिंदे दांपत्यावर कारवाई करावी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. ठाण्यातील वाढती गुन्हेदारी, ड्रग माफियांचा विखळ्यात सापडपेलं ठाणे शहर भयमुक्त करण्याच्या मागणीसाठी सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला ठाण्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES