SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गुप्तांगाच्या भागात 3 जखमा अन्...; ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करणाऱ्या तरुणाच्या मेडिकल रिपोर्टमधून काय आलं समोर?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलं आहे. या प्रकरणात आता ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात येत आहे. राम पूर्णेकरांसोबत त्या तरुणांनी कापूरबावडी पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यातील एक तरुणाचा मेडिकल अहवाल समोर आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 09:22 AM IST | Updated: Oct 31, 2026, 09:26 AM IST
Image Credit: Thane police reveal
Join

ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाले आहे. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणि SIT ने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या माजी नगरसेवका मीनाक्षी शिंदे यांची चौकशी केली. त्यासोबत मीनाक्षी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची आठ वेळा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येच्या एक महिन्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राम पूर्णेकरांसोबत पूर्णेकर समर्थक असलेल्या दोन तरुणांनी कापूरबावडी पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत.

कापूरबाडी पोलिसांनी या दोन तरुणांना बेदम मारहाण करुन त्यांच्यासोबत अश्लीलपणे मारहाण करण्यात आली आहे. या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली असता ठाणे सिव्हिल हॉस्पिटमध्ये त्यांचे मेडिकल चेकअप करण्यात आले. त्यातील एक तरुणाचा मेडिकल अहवाल समोर आला आहे.  

हेसुद्धा वाचा  - अंतर्वस्त्र काढायला लावली अन्..., सूर्यफूल तेल लावून लघवीच्या जागेवर...; पूर्णेकर समर्थकांवर ठाणे पोलिसांकडून अत्याचार झाल्याचा आरोप, तरुण म्हणाला...

पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत गंभीर बाबी समोर आली आहे. या अहवालानुसार गळ्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पीडितेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोलिसांकडून पट्टा आणि दांडक्याने शारीरिक मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. या अहवालानुसार या पीडित तरुणाच्या गुप्तांगाच्या भागात तीन जखमा आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपासणीसाठी X-Ray काढण्यात आला आहे. 

तर आवश्यक वैद्यकीय उपचारांतर्गत TT Injection देण्यात आले आहे. गुप्तांगाच्या भागातून फॉरेन्सिक तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून तो सीलबंद करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. हा नमुना कापूरबावडी पोलिसांमार्फत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडे पाठवण्यात येणार आहे.

हेसुद्धा वाचा -  आदित्य ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर 2 जणांना ताब्यात घेतल अन् नाजूक जागी...; राम पूर्णेकरांचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

आता पोलिसांच्या आरोपानंतर एफएसएल अहवाल हा महत्त्वाचा ठरणार आहे. तर पोलीस या प्रकरणात पुढील तपासात काय होतं, पोलीस आपली भूमिका कधी मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाचे या पीडित तरुणांना पोलिसांच्या मारहाणीतच गंभीर दुखापत झाली आहे की, यामागे अजून काही दडलंय हे पाहावं लागणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES