SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'प्रत्येक व्यक्तीशी माझा संबंध..., प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात मीनाक्षी शिंदेचं मोठं वक्तव्य; 'पोलिसांनी बोलवल्यास मी...'

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पतीची पोलिसांकडून दोन दिवस सलग चौकशी झाली. यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही मोठं वक्तव्य केलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 16, 2026, 02:42 PM IST | Updated: Oct 16, 2026, 02:47 PM IST
Image Credit: Meenakshi Shinde
Join

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात चौकशी जशी जशी पुढे जातेय, यात अनेक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पूर्णेकर यांच्या कुटुंबाने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यावर आरोप केला आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलगा राम पूर्णेकर यांनी आरोप केला की, मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या सांगण्यावरून ही प्रदीप पूर्णेकरांची हत्या करण्यात आली. प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी हे मीनाक्षी शिंदे यांच्या घरी दिसल्याने पोलिसांचीही संशयाची सूई त्यांच्यावर आहे.

अशातच पोलिसांनी सलग दोन दिवस राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली. पहिल्या दिवशी नऊ दिवस आणि दुसऱ्या दिवशी आठ तास राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी चौकशी केली. महत्त्वाचे म्हणजे राजेंद्र शिंदे आणि मारेकरी यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. ज्यात राजेंद्र शिंदे यांनी आपण मारेकऱ्यांना ओळखत असल्याचे सांगितलं. पण माझी पत्नी नगरसेविका असल्याने हे पाच मारेकरी बंगाल्यावर येऊन गेले होते, एवढीच माझी ओळख आहे. तर प्रदीप पूर्णेकर प्रकरणात माझा काही संबंध नसल्याचे राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांनी सांगितलं. 

हेसुद्धा वाचा -  'होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या पाचही मारेकरांना ओळखतो...', मीनाक्षी शिंदेंच्या पतीचा मोठा खुलासा! 'माझी पत्नी नगरसेविका...'

दुसरीकडे राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीनंतर मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात की, एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या प्रकरणात गोवल्यानंतर पोलिसांकडून चौकशी तर होणारच आहे. अशा परिस्थितीत प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मी किंवा माझ्या कुटुंबाकडून पोलिसांच्या तपासात कोणताही अडथळा येणार नाही. याबद्दल मी पहिल्याच दिवस स्पष्ट केलं होतं. माझ्या पतीची दोन दिवस पोलिसांकडून चौकशी झाली आहे. पोलिसांनी पतीला चौकशीसाठी बोलवल्यानंतर ते गेले होते. आम्ही पोलिसांच्या कोणत्याही कामात अडथळा निर्माण करणार नाही. पोलिसांनी जर मला बोलवलं तर मीही कामकामाजाचा भाग म्हणून चौकशीसाठी जाईल. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES