SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मला आयुष्य संपवावं असं वाटत आहे,' राम पूर्णेकरांनी व्यक्त केली निराशा; म्हणाले 'माझा बाप गेलाय आणि यांना 16 व्हिडीओ देऊनही...'

मला आत्महत्या करावंसं वाटत आहे. मी इतका निराश झालो आहे अशी हतबलता राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 28, 2026, 05:54 PM IST | Updated: Oct 28, 2026, 06:06 PM IST
Image Credit: 'मला आयुष्य संपवावं असं वाटत आहे,' राम पूर्णेकरांनी व्यक्त केली निराशा
Join

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. न्यायाच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंब आणि समर्थक रस्त्यावर उतरले होते. घोडबंदर रोडवर रात्रभर रास्तारोको, टायर जाळण्यात आले. तर पोलीस स्टेशनबाहेरही ठिय्या आंदोलन सुरू राहिलं. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी करत असतानाच ठाण्यात वातावावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. दरम्यान आज पूर्णेकर कुटुंबाने पत्रकार परिषद घेत तपासात प्रगती होत नसल्याने नाराजी जाहीर केली. यावेळी राम पूर्णेकर यांनी आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत आहे अशी हतबलता व्यक्त केली.

एसआयटीने आज सकाळी पत्रकार परिषद घेत या प्रकऱणातील तपासाची माहिती दिली. मात्र यावर आपण समाधानी नसल्याचं पूर्णेकर कुटुंबाने सांगितंल आहे. "आमच्या सर्व अपेक्षाच संपल्या आहेत. एसआयटीकडून फक्त तपास सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. आम्हाला अपेक्षा होती की, ते उत्तर देतील. पण ते आम्हालाच प्रश्न विचारत होते. हत्या झाल्यानंतर बाजूला उभा राहणाराही आरोपी असतो. आम्ही व्हिडीओ दाखवल्यानंतरही काही झालेलं नाही. तपास सुरु आहे इतकंच उत्तर दिलं जात आहे," अशी खंत राम पूर्णेकरांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेतून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आम्ही आता एसआयटीची मदत घेणार नाही. त्यांच्यासमोर हात जोडणार नहाी. जे काही निर्णय आहेत ते स्वतंत्रपणे घेतले जातील असंही त्यांनी सांगितलं. मला आता मुख्यमंत्र्यांना भेटायचंच आहे असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी आपल्याला आत्महत्या करावाशी वाटत असल्याची हतबलता बोलून दाखवली. "मला आत्महत्या करावंसं वाटत आहे. मी इतका निराश झालो आहे. 29 दिवस झाले माझा बाप जाऊन पण यांना काही सापडत नाही. त्यांना इतके पुरावे दिले आहेत, व्हिडीओ दिले आहेत," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी आता मी एक नवा व्हिडीओ आणणार आहे असंही म्हटलं.

मी दिवसाचे फक्त 25 मिनिटं झोपत आहे. माझ्या डोक्यावर काय परिणाम होत आहे हे माझं मला माहित आहे असंही ते म्हणाले आहेत. 30 दिवस काय चित्रपट सुरु आहे असं सांगत त्यांनी नरेश म्हस्केंच्या आरोपांना उत्तर दिलं. आम्ही न्ययाासाठी लढत असताना याला खूप राजकीय बनवलं आहे असं त्यांच्या कुटुंबाने म्हटलं.

अमित सिंग डमी आरोपी आहे. डमी शब्दावर ते काहीच उत्तर देत नाही आहेत. त्यांनी कोर्टाला वेड्यात काढलं आहे. कॅमेऱ्यात राम शिंदे दिसत आहे. त्याला किती पैसे दिलेत माहिती नाही. पण तो खोटा आहे. जेव्हा त्याला अटक केली तेव्हाच मी म्हणालो होतो असंही त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र पोलिसांचं हे मोठं अपयश आहे. हल्लेखोराला वाचवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.

पप्या शिंदेने पोलिसांसमोर मिनाक्षी शिंदेंनी सुपारी दिल्याचं कबुल केलं होतं. पण पोलिसांनी ही गोष्ट बाहेर काढली नाही. हे षडयंत्र फार मोठं आहे असा आरोप त्यांनी केला. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES