ठाणे शहरात मंगळवारी रात्री थरकाप उडवणारी घटनेमुळे भीतीदायक वातावरण आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात प्रदीप यांच्या मृत्यू झाला आहे. प्रदीप पूर्णेकर ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांसोबत असताना ही घडली आहे.प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतरचा पहिला सीसीटीव्ही समोर आला आहे. यात दोघे चेहरा लपवून पूर्णेकरांच्या कार्यालयात शिरले असं दिसून आले आहे. तर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पूर्णेकरांवर गोळीबार केल्याचे दिसून येत आहे.
तर या प्रकरणी नवीन सीसीटीव्ही फुटेज आले समोर आला आहे. हा सीसीटीव्ही बाजूच्या मेडिकलमधील फुटेज आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर ७ गोळ्या झाडल्याचे फुटेज मध्ये आवाज ऐकू येत आहे. जखमी प्रदीप पूर्णेकर यांना घेवून जातावा सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. तसेच मागच्या मैदानातून आरोपी आल्याचेही सीसीटीव्हीद्वारे समोर आले आहे. नंतर आरोपींपैकी एकाने सिग्नल दिला. मग तोंडाला रुमाल बांधून आरोपी पुन्हा मैदानातून ऑफिसकडे गेले. प्रदीप पूर्णेकरांवर हल्ला केला आणि तिथूनच पुढे पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.
यातील दोन गोळ्या थेट प्रदीप पूर्णेकर यांच्या छातीत लागल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, छातीत गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागील कारण काय? आणि मारेकरी नेमके कोण होते होते याचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांवर आलं आहे.