SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

5 जणांची फिल्डिंग, ऑफिसमध्ये घुसून प्रदीप पुर्णेकरांवर..., हादरवणारा CCTV सीसीटीव्ही संपूर्ण घटना समोर

मंगळवारी रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर पाच जणांना अंदाधुंद गोळीबार केला. यात प्रदीप याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 30, 2026, 11:32 AM IST | Updated: Oct 16, 2026, 01:50 PM IST
Image Credit: 5 जणांची फिल्डिंग, ऑफिसमध्ये घुसून प्रदीप पुर्णेकरांवर...
Join

ठाणे शहरात मंगळवारी रात्री थरकाप उडवणारी घटनेमुळे भीतीदायक वातावरण आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात प्रदीप यांच्या मृत्यू झाला आहे. प्रदीप पूर्णेकर ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांसोबत असताना ही घडली आहे.प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतरचा पहिला सीसीटीव्ही समोर आला आहे. यात दोघे चेहरा लपवून पूर्णेकरांच्या कार्यालयात शिरले असं दिसून आले आहे. तर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पूर्णेकरांवर गोळीबार केल्याचे दिसून येत आहे.

तर या प्रकरणी नवीन सीसीटीव्ही फुटेज आले समोर आला आहे. हा सीसीटीव्ही ⁠बाजूच्या मेडिकलमधील फुटेज आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर ७ गोळ्या झाडल्याचे फुटेज मध्ये आवाज ऐकू येत आहे. ⁠जखमी प्रदीप पूर्णेकर यांना घेवून जातावा सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.  तसेच मागच्या मैदानातून आरोपी आल्याचेही सीसीटीव्हीद्वारे समोर आले आहे.  नंतर आरोपींपैकी एकाने सिग्नल दिला. मग तोंडाला रुमाल बांधून आरोपी पुन्हा मैदानातून ऑफिसकडे गेले. प्रदीप पूर्णेकरांवर हल्ला केला आणि तिथूनच पुढे पळून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

यातील दोन गोळ्या थेट प्रदीप पूर्णेकर यांच्या छातीत लागल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, छातीत गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागील कारण काय? आणि मारेकरी नेमके कोण होते होते याचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांवर आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES