उल्हासनगर क्राईम : शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या पुतण्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर आरोपी फरार आहे. शाखाप्रमुख पदाच्या वादावरून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर शहरात राजकीय वर्चस्व आणि आपापसातील वादातून एक गंभीर घटना समोर आली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मराठा सेक्शन परिसरातील शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख विशाल माणिक वाविस्कर यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात विशाल वाविस्कर यांच्या पाठीवर तसेच दोन्ही मनगटांवर चाकूने अनेक वार करण्यात आले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक चंद्रशेखर यादव यांचे पुतणे चिराग राकेश यादव (वय 23 ते 24 वर्ष) याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून विठ्ठलवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शाखाप्रमुख पदावरून अनेक दिवसापासून वासरू होता या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नागपूर शहरातील वाडी परिसरात एका तरुणावर तिघांनी मिळून चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. वैभव बैस असे जखमी तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. संपूर्ण हल्ल्याचा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव हा दुकानात काम करतो. तिघा हल्लेखोरांनी सुरुवातीला दुकानाबाहेर वैभववर चाकूने वार केले. त्यानंतर दुकानात घुसून पुन्हा त्याच्यावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान, दुकानमालक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हल्लेखोरांना तेथून हटवले. त्यानंतर गंभीर जखमी वैभवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.